1. दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर, दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे दरम्यान, तर बारावीची परीक्षा 23 एप्रिलला


2. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागपुरात आज-उद्या नागरिकांनी घरीच राहण्याचं पालिकेचं आवाहन, बुलडाण्यात 1 मार्चपर्यंत कडक लॉकडाऊन तर वर्धा-यवतमाळमध्ये संचारबंदी


3. मराठवाड्यातल्या लातूरमध्ये जनतेनं स्वयंस्फूर्तीनं जनता कर्फ्यू पालन करण्याचं आवाहन, तर ठाण्यात 15 मार्चपर्यंत कठोर निर्बंध, सभा आणि आंदोलनांना बंदी


4. बदनामी थांबवा अन्यथा कुटुंबासह आत्महत्या करू, पूजाच्या वडिलांचा उद्विग्न इशारा, तर मृत्यूच्या दिवशी राठोडांच्या मोबाईलवरुन पूजाला 45 कॉल्स, भाजपचा आरोप


5 . भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे मॉर्फ केलेले फोटो सोशल मीडियात व्हायरल, चित्रा वाघ पोलिसात तक्रार करणार



6. मराठी भाषा दिनानिमित्त पोलिसांची परवानगी नसली तरी मनसे स्वाक्षरी अभियानावर ठाम, नाशकातल्या कुसुमाग्रजांच्या निवासस्थानाला आकर्षक रोषणाई


7. मराठीत शिक्षण झाले म्हणून मुंबई पब्लिक स्कूलने नोकरी नाकारली, उमेदवारांना न्याय देण्याची अभिनेत्री चिन्मयी सुमित यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी


8. मळणी यंत्रात केस अडकल्याने महिलेचं डोकं धडावेगळं, सोलापुरातील पोठरे गावातील दुर्घटना


9. 'एबीपी माझा'च्या बातमीनंतर भिवंडी पालिका खडबडून जागी; महापौर चषकाच्या आयोजकांवर पालिकेकडून गुन्हा दाखल


10. पाच राज्यांच्या निवडणुकांचं बिगूल, पश्चिम बंगालमध्ये 27 मार्चपासून आठ टप्प्यांत मतदान, तर तामिळनाडूमध्ये एकाच टप्प्यात 6 एप्रिलला मतदान, 2 मे रोजी निकाल