एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 03 ऑक्टोबर 2020 | शनिवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
- हाथरस प्रकरणी पोलीस अधीक्षकांसह सात जणांचं निलंबन, पीडित कुटुंबीय, आरोपी आणि पोलिसांची नार्को टेस्ट होणार; हाथरसमध्ये माध्यमांना मज्जाव
- यूपी सरकार आणि भाजपची प्रतिमा खराब होतेय, माध्यमांना पीडितेच्या कुटुंबीयाना भेटू द्या, भाजप नेत्या उमा भारतींकडून एबीपी न्यूजच्या भूमिकेचं समर्थन; पोलिसांच्या भूमिकेवरही नाराजी
- आता काशी-मथुराची चर्चा होऊ लागली आहे, देशातील समाजिक ऐक्य कंस टिकणार?, बाबरी विध्वंस प्रकरणातील निकालानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून चिंता व्यक्त
- मला वाटतं ते रात्री कपडे घालूनच तयार असतात, मध्यावधी निवडणुकांवरील वक्तव्यावरुन शरद पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला
- विनायक मेटेंच्या उपस्थितीमध्ये आज पुण्यात मराठा मंथंन परिषद, उदयनराजे, संभाजीराजे उपस्थित राहणार
- खासदार संभाजीराजे यांचा धनगर आरक्षणाला पाठिंबा, कोल्हापुरात राम शिंदे यांच्याकडून भेट; तर धनगर समाज गोलमेज परिषदेत तीन ठराव
- 2019 विधानसभा निवडणुकीत दिलेली वचनं पूर्ण केली नाहीत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून जनतेची फसवणूक; आम आदमी पक्षाकडून अमरावतीत तक्रार दाखल
- देशात कोरोना बळींची संख्या 1 लाखांच्या पार, गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 81 हजार 484 नवे रुग्ण; दररोज सरासरी हजार रुग्णांचा मृत्यू
- अमेरिकन फेडरल न्यायाधीशांकडून 1 बी व्हिसा वरील बंदी उठवली; डोनाल्ड ट्रम्प यांच्या बंदीच्या निर्णयाला आळा; भारतीयांना दिलासा
- सनरायझर्स हैदराबादकडून चेन्नई सुपर किंग्सचा 7 धावांनी पराभव, रविंद्र जाडेजा आणि महेंद्रसिंह धोनीची झुंज अपयशी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement