एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 03 जुलै 2020 | शुक्रवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
1. कोरोना चाचणीसाठी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनच्या सक्तीमध्ये शिथीलता आणा, आयसीएमआरच्या सर्व राज्यांना पत्र लिहून सूचना 2. रेल्वेच्या खाजगीकरणाला सुरुवात? देशात 109 मार्गांवर धावणार 151 खाजगी रेल्वे; योजनेंतर्गत 30 हजार कोटी रुपयांची खाजगी क्षेत्राची गुंतवणूक 3. राज्यात काल दिवसभरात 8 हजार 18 जणांची कोरोनावर मात, कोरोनामुक्त रुग्णांची एकूण संख्या एक लाख पार, तर 6 हजार अधिक नवे रुग्ण 4. लॉकडाऊन वाढवल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये नाराजी, शरद पवार मुख्यमंत्री ठाकरे यांना भेटण्याची शक्यता; उद्धव ठाकरे, अजित पवार यांची वर्षावर बैठक 5. येत्या 24 तासांत मुंबईसह राज्यभर मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज; पुढील चार दिवसांत आणखी जोर वाढण्याची शक्यता पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 03 जुलै 2020 | शुक्रवार | ABP Majha 6. कारागृहात फैलावणाऱ्या कोरोना संदर्भातील याचिकेवर हायकोर्टाचा निकाल जाहीर; लक्षणं आढळणाऱ्या कैद्यांची त्वरित चाचणी करण्याचे निर्देश 7. बॉलिवूडच्या प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शका सरोज खान यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन, वयाच्या 71 व्या वर्षी अखेरचा श्वास; बॉलिवूडवर शोककळा 8. मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेते लीलाधर कांबळी यांचं निधन, राहत्या घरी वयाच्या 83व्या वर्षी अखेरचा श्वास; दोन वर्षांपासून कर्करोगाशी झुंज 9. मुंबईमध्ये कोरोनाच्या चाचण्या कमी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आरोप; 100 चाचण्यांमागे 28 जण पॉझिटिव्ह असल्याचा दावा 10. चीनच्या मुजोरीनं टोक गाठलं, रशियाच्या व्लादिवोस्तोक शहरावरही दावा सांगितला; एकतर्फी करार करुन रशियानं हे शहर बळकावल्याचं चीनचा आरोपअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement