एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
स्मार्ट बुलेटिन | 3 एप्रिल 2019 | बुधवार | एबीपी माझा
राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये
स्मार्ट बुलेटिन | 3 एप्रिल 2019 | बुधवार | एबीपी माझा
1. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा महाराष्ट्रात, गोंदियात संध्याकाळी जाहीर सभा, तर उद्यापासून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचाही महाराष्ट्र दौरा
2. पंतप्रधान मोदींनी पवार कुटुंबाची चिंता करु नये, कोल्हापुरातील सभेत शरद पवाराचं प्रत्युत्तर तर पुतणे अजित पवारांवर स्तुतीसुमनं
3. चौथ्या टप्प्यातील मतदानासाठी अर्ज भरण्यासाठी सुरुवात, आज सुप्रिया सुळे, इम्तियाज जलील, मोहन जोशींसह अनेक दिग्गज नेते अर्ज दाखल करणार
4. अनामत रक्कम म्हणून लोकसभा उमेदवाराकडून 25 हजारांची चिल्लर, जळगावमधला प्रकार, पैसे मोजताना अधिकाऱ्यांची दमछाक
5. निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं टेम्पल रन, वसईतील गुरुद्वारामध्ये माथा टेकवला, तर बिशप हाऊस आणि वसई किल्ल्यालाही भेट
6. देशद्रोहाचा गुन्हा रद्द करण्याचं आश्वासन म्हणजे देश तोडण्याचा प्रयत्न, काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर भाजपची टीका, शेतकरी, बेरोजगारांसाठी काँग्रेसच्या मोठ्या घोषणा
7. मुंबई महापालिकेतील भाजपच्या दोन, काँग्रेसच्या एका नगरसेवकाचं पद रद्द, जातीचे बनावट दाखले सादर करणं महागात, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
8. यंदाच्या मान्सूनसंदर्भात स्कायमेटचा दुसरा अंदाज आज जाहीर होणार, अंदाजाकडे शेतकऱ्यांसह सामान्यांचंही लक्ष
9. आईने PUBG खेळू न दिल्याने 17 वर्षीय मुलाने घर सोडले, भिवंडीतली धक्कादायक घटना, पोलिसांकडून तपास सुरु
10. राजस्थान रॉयल्सकडून बंगलोरचा सात विकेटसनी धुव्वा, जोश बटलरची 59 धावांची खेळी, आयपीएलमध्ये बंगलोरचा सलग चौथा पराभव
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्रीडा
निवडणूक
क्रिकेट
Advertisement