एक्स्प्लोर
Advertisement
स्मार्ट बुलेटिन | 30 ऑक्टोबर 2019 | बुधवार | एबीपी माझा
#Latest News #Marathi News #Smart Bulletin राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये
1. दिवाळीनंतर राज्यात राजकीय बैठकांचा सिलसिला, भाजप आणि राष्ट्रवादीचा विधीमंडळ नेता आज ठरणार, तर काँग्रेसचीही स्वतंत्र खलबतं
2. मुख्यमंत्रीपदाबद्दल फडणवीसांनी शब्द फिरवल्याने बैठक रद्द केल्याचं शिवसेनेकडून स्पष्ट, तर सेनेची भूमिका म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी, मुनगंटीवारांचा पलटवार
3. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह 1 किंवा 2 नोव्हेंबरला मुंबई दौऱ्यावर येण्याची शक्यता, उद्धव ठाकरेंशी चर्चा करुन सत्तास्थापनेचा फॉर्म्युला ठरवण्याचं आव्हान
4. काँग्रेस हायकमांडकडून हवी तशी साथ न मिळाल्याने मोठं नुकसान, विरोधी पक्षनेते वड्डेटीवारांची 'एबीपी माझा'च्या कॅमेऱ्यासमोर खंत, विदर्भातल्या नेत्यांवरही आसूड
5. 'आमच्या इथे डिपॉझिट जप्त करुन मिळेल', बारामतीमधल्या अजित पवारांच्या अभिनंदनाच्या बॅनरची जोरदार चर्चा
6. कोल्हापुरात गोकुळ दूध संघाची सर्वसाधारण सभा, अनुचित प्रकार टाळण्यासाठी सत्ताधारी गटावर खुर्च्या बांधून ठेवण्याची वेळ
7. परतीच्या पावसाचा कहर सुरुच, मराठवाड्यात सोयाबीन तर विदर्भात कापसाचं मोठं नुकसान, मनमाडमधल्या द्राक्षांच्या बागा झोपल्या, रब्बीच्या पेरणीलाही मोठा फटका
8. सैन्य भरतीसाठी नाशिकमध्ये तरुणांची तोबा गर्दी, 63 जागांसाठी जवळपास 20 हजार तरुण नाशकात, कुठलीही सुविधा नसल्याने मोठी गैरसोय
9. कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये मोठा हल्ला, कुलगाममध्ये दहशतवाद्यांकडून पाच मजुरांची निर्घृण हत्या, सर्व मजूर पश्चिम बंगालमधले
10. भारत आणि बांगलादेशमधील दुसरा कसोटी सामना डे-नाईट, बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलींची माहिती, कोलकात्यात 22 नोव्हेंबरपासून दुसरा सामना
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement