एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 30 ऑगस्ट 2019 | शुक्रवार | एबीपी माझा
#Latest News #Marathi News #Smart Bulletin राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये
1. भाजपच्या दुसऱ्या टप्प्यातील मेगाभरतीचा मुहूर्त ठरला, अमित शाहांच्या उपस्थितीत प्रवेश, हर्षवर्धन, उदयनराजे, रामराजे, राणा, महाडिक, गोरेंचा समावेश
2. खासदार नारायण राणेंचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन होणार, राणेंची एबीपी माझाला माहिती, दोन्ही मुलांसह भाजपात प्रवेश करणार
3. पाकिस्तानचा भारतात हिंसा घडवण्याचा डाव, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती, अण्वस्त्र वाहून नेणाऱ्या गझनवी क्षेपणास्त्राचीही पाककडून चाचपणी
4. फ्लॅट धारक आता इमारतीच्या जमिनीचे मालक होणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय, जमिनीच्या सातबाराचे मालकीहक्क फ्लॅट धारकांना मिळणार
5. मुंबईतल्या पाच मोठ्या रस्त्यांवर महापालिकेकडून पार्किंग बंदी, चर्चगेटसह दादरमधील मार्गांचा समावेश, आजपासून निर्णयाची अंमलबजावणी
6. आरे मेट्रो कारशेडसाठी दोन हजार 238 झाडांवर कुऱ्हाड पडणारच, वृक्ष प्राधिकरण समितीची कारवाईला मंजुरी, सत्तेत असूनही झाडं वाचवण्यात शिवसेना अपयशी
7. वर्षभरात बँकांची 71 हजार 542 कोटी रुपयांची फसवणूक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वार्षिक अहवालातून धक्कादायक माहिती समोर
8. पॅरा अॅथलीट दीपा मलिकचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान, तर 19 खेळाडूंचा अर्जुन आणि 3 प्रशिक्षकांचा द्रोणाचार्य पुरस्काराने गौरव
9. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर, 15 सदस्यीय संघात माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला स्थान नाही
10. प्रभास आणि श्रद्धा कपूरचा बहुचर्चित साहो चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीला, प्रेक्षकांमध्ये तुफान उत्सुकता, दिल्लीतील थिएटरमध्ये तिकीटाचे दर 2200 रुपयांवर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
बातम्या
नाशिक
राजकारण
Advertisement