1. जुन्या आणि नव्या टॅक्स स्लॅबनुसार आयकर भरण्याचा पर्याय, अर्थसंकल्पात करकपातीची घोषणा, मात्र स्टँडर्ड डिडक्शनसारख्या करसवलतींना कात्री
2. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी 16 कलमी कार्यक्रम, शेती, सिंचन आणि ग्रामविकासासाठी 2 लाख 83 हजार कोटी, सौरउर्जा वापरावर विशेष भर
3. रोजगारनिर्मितीसाठी इन्फ्रास्ट्रक्टचरमध्ये 5 वर्षांत 100 लाख कोटी गुंतवणार, एलआयसी आणि आयडीबीआयमधील समभाग विकून सरकार पैसा उभा करणार
4. लग्नाप्रमाणेच मातृत्त्वाच्या वयासंदर्भात कायदा आणण्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे संकेत, टास्क फोर्सची घोषणा, महिलांसाठी 28 हजार कोटींचा निधी
5. गड-किल्ल्यांवर दारु पिऊन गोंधळ घालणाऱ्यांना सहा महिने सश्रम कारावास, राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय, दहा हजार रुपये दंडाचीही तरतूद
6. जामियानंतर शाहीनबागमध्ये सीएए विरोधातील आंदोलनात गोळीबार, हल्लेखोर कपिल गुर्जर पोलिसांच्या ताब्यात
7. राज्यातील कोरोना व्हायरसचे सर्व संशयित रुग्णांचे सॅम्पल्स निगेटिव्ह, सर्व रुग्णांना लवकरच डिस्चार्ज मिळणार
8. कुणाल कामराची प्रवास बंदीविरोधात इ़ंडिगो एअरलाईन्सला नोटीस, 25 लाखांच्या नुकसान भरपाईची मागणी
9. मुंबईत जोगेश्वरी भागात भीषण पाणीटंचाई, तीन दिवसांपासून पाणीपुरवठा बंद, कवी सौमित्र यांची फेसबुक पोस्ट व्हायरल
10. पश्चिम रेल्वेवर भाईंदर ते वसई रोडदरम्यान आज मेगाब्लॉक, सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत अप आणि डाऊन मार्गांवरील वाहतूक राहणार बंद