Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 27 मे 2021 | गुरुवार | ABP Majha
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 27 मे 2021 | गुरुवार | ABP Majha
1. चौदा हजार कोटींच्या पीएनबी घोटाळ्यातील आरोपी मेहूल चोक्सीला डॉमनिकामधून अटक, चोक्सीला भारताकडे सोपवणार, अँटिग्वाच्या पंतप्रधानांची प्रतिक्रिया
2. राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक, मराठा आरक्षण, पदोन्नतीमधील आरक्षण आणि लॉकडाऊनसह अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा
3. राज्यात बुधवारी डिस्चार्जपेक्षा नवीन कोरोना रुग्ण अधिक, तर मुंबईतही दैनंदिन रुग्ण वाढले, पुण्यात 683 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
4. मराठा आरक्षणाबाबत संवाद साधण्यासाठी भाजप नेते वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या दौऱ्यावर, तर संभाजीराजे छत्रपती आज शरद पवारांना भेटणार
5. मुक्ताईनगर पंचायतीच्या भाजप गटनेत्यासह सात विद्यमान आणि तीन माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश, अपात्रतेच्या भीतीपोटी पक्षांतर, खडसेंची प्रतिक्रिया
6. गायब आमदार प्रताप सरनाईक यांचा शोध घ्या, भाजप शिष्टमंडळाचं ठाणे पोलीस आयुक्तांना साकडं, ईडीच्या छाप्यानंतर सरनाईकांवर चौकशीची टांगती तलवार
7. कोणाच्याही बापात मला अटक करण्याची हिंमत नाही, आयएमएने देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासाठी मोदींना पत्र पाठवल्यानंतर रामदेव बाबांची प्रतिक्रिया
8. अनोळखी तरुणीशी केलेली मैत्री मुंबईतील तरुणाला महागात, भेटण्याच्या बहाण्याने हनीट्रॅपमध्ये अडकवलं, तरुणाकडे 20 लाखांची मागणी
9. काही दिवसांपासून स्थिर असलेल्या सोन्याला झळाळी, सोन्याच्या दरात प्रतितोळा 800 रुपयांनी वाढ तर चांदी प्रतिकिलो 1500 रुपयांनी वधारली
10. 25 फेब्रुवारीला पाठवलेल्या नोटीसचं पालन का केलं नाही, केंद्र सरकारची सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना विचारणा, तर हायकोर्टातल्या व्हॉट्सअॅपच्या याचिकेलाही उत्तर
Before You Go
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
महत्त्वाच्या बातम्या




















