एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 26 मे 2019 | रविवार | एबीपी माझा
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या स्मार्ट बुलेटिनमध्ये

Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 26 मे 2019 | रविवार | ABP Majha
- केरळ आयसिसच्या निशाण्यावर, गुप्तचर यंत्रणांचा हाय अलर्ट, 15 अतिरेकी श्रीलंकेहून लक्षद्वीपकडे निघाल्याची माहिती
- दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी सनातनचे वकील संजीव पुनाळेकरांसह विक्रम भावेला अटक, सीबीआयची कारवाई, पुरावे नष्ट केल्याचा आरोप
- राष्ट्रपतींकडून पंतप्रधान मोदींची नवनिर्वाचित पंतप्रधान म्हणून नियुक्ती, आज मोदी अहमदाबादेत, आईचा आशिर्वादही घेणार
- राहुल गांधी काँग्रेस नेत्यांच्या पुत्रप्रेमावर बरसल्याची माहिती, गहलोत, कमलनाथ आणि चिदंबरम यांनी मुलांच्या तिकीटासाठी दबाव टाकल्याची चर्चा
- 'साहेब बदला घेतला', विजयानंतर नांदेडचे नवे खासदार प्रतापराव चिखलीकरांचे नारायण राणेंच्या पाया पडताना उद्गार
- प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा संघस्थानी येण्याची शक्यता, आरएसएसकडून मुख्य अतिथी म्हणून आमंत्रण
- तीन वर्षांचे बाळ 50 फूट खोल विहिरीत पडले, तीन तास विहिरीत असूनही सुखरुप, महाबळेश्वरमधील घटना
- ठाण्यातील कोपरीत गाडून ठेवलेल्या तोफांना मोकळा श्वास, माझाच्या बातमीनंतर प्रशासन कामाला, 13 तोफा पैकी 6 तोफा सुशोभित करणार
- राज्य शासनाच्या व्ही.शांताराम पुरस्काराची घोषणा, ज्येष्ठ अभिनेत्री सुषमा शिरोमणींना जीवनगौरव तर अभिनेते भरत जाधवांना विशेष योगदान पुरस्कार
- इंग्लंडमधील विश्वचषकात टीम इंडियासाठी धोक्याची घंटा, सलामीच्या सराव सामन्यात न्यूझीलंडनं भारताचा सहा विकेट्सनी उडवला धुव्वा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
कोल्हापूर
विश्व
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
