एक्स्प्लोर
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 26 जानेवारी 2020 | रविवार
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये
![Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 26 जानेवारी 2020 | रविवार ABP Majha smart bulletin for 26th January 2020 latest updates Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 26 जानेवारी 2020 | रविवार](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/01/26093654/smart-bulletin.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
-
- देशभरात 71व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह, राजपथावर भारताच्या लष्करी सामर्थ्याचं होणार प्रदर्शन, ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची विशेष उपस्थिती
- प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात हायअलर्ट, मुंबई, दिल्लीत पोलिसांचा कडेकोट पोलिस बंदोबस्त, वाहन आणि चालकांची तपासणी
- प्रजासत्ताक दिनानिमित्त पंढरीच्या विठ्ठल मंदिराला आकर्षक सजावट, तिरंगी फुलांनी नटला विठुरायाचा गाभारा
- प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला दिल्लीतील राजपथ झळाळला, तर मुंबईतील सीसीएमटी, बीएमसीवर इमारतींवर तिरंग्याची रोषणाई
- अरुण जेटली, सुषमा स्वराज, जॉर्ज फर्नांडिस,मनोहर पर्रिकरांना मरणोत्तर पद्म पुरस्कार, तर सुरेश वाडकर, राहिबाई पोपेरे, पोपटराव पवार यांच्या रुपात मराठी कर्तृत्वाचा गौरव, सिनेस्टार आणि खेळाडूंचीही नावं जाहीर
- अदनान सामीला पद्म पुरस्कार देण्यास मनसेचा विरोध, अदनान मूळचा भारतीय नसल्यानं पुरस्कार रद्द करण्याची मागणी, ट्विट करुन अदनानकडून भारत सरकारचे आभार
- राज ठाकरे रंग बंदलू, तर हिंदुत्त्व सोडून उद्धव ठाकरे धर्मनिरपेक्ष झाले, असदुद्दीन ओवैसींची बोचरी टीका, तर 7 मार्चला मुख्यमंत्री अयोध्या दौऱ्यावर
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची तारीख ठरली, 7 मार्चला अयोध्या दौरा, तर भगवा हातात धरणाऱ्या मनसेवर सामनातून बोचरी टीका
- आम्ही सत्तेचा कमरपट्टा लावून आलो आहोत, आमची सत्ता आता जाणार नाही, राजू परुळेकर यांनी घेतलेल्या मुलखतीत संजय राऊतांची रोखठोक उत्तरं
- दीड कोटींच्या विम्यासाठी मित्राची हत्या करुन स्वतःच्या मृत्यूचा बनाव, सातारा पोलिसांकडून प्रकरणाचा पर्दाफाश, आरोपीला कुटुंबियांसह अटक
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
बॉलीवूड
महाराष्ट्र
शिक्षण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)