स्मार्ट बुलेटिन | 25 जून 2020 | गुरुवार | एबीपी माझा
संजय कुमार यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती, अजोय मेहता मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार
एसटी कर्मचाऱ्यांवर पगारकपातीची कुऱ्हाड, या महिन्यात केवळ 50 टक्के वेतन मिळणार
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल नामनियुक्त आमदारांच्या नियुक्त्या लांबणीवर पडण्याची शक्यता
एमडी आणि एमएसच्या परीक्षा पुढे ढकला, मुख्यमंत्री ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना पत्र
अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यासाठी केंद्रीय स्तरावरही हालचाली, यूजीसीकडून लवकरच निर्णय जाहीर होण्याची शक्यता
सरकार उंटावरुन शेळ्या हाकत असल्यासारखं प्रशासन चालवतंय, मनसे नेते संदीप देशपांडेंचा आरोप
औरंगाबाद येथील उद्योजकांचे फेसबुक अकाउंट हॅक, 214 जणांना मागितले 15 हजार रुपये
पश्चिम बंगालमध्ये 31 जुलैपर्यंत लॉकडाऊनमध्ये वाढ; मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची घोषणा
कोरोना संसर्गावरील औषधावरुन पतंजली नव्या वादात, कोरोना किट लाँच करेपर्यंत आयुष मंत्रालयाला माहिती नसल्याचं स्पष्ट
भारताच्या भूभागावर चीनचं अतिक्रमण नाहीच; सॅटेलाईट फोटोंमधून स्पष्ट