एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 24 ऑगस्ट 2020 | सोमवार | ABP Majha
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
1. सोनिया गांधी हंगामी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता, अकरा वाजता काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक, सीडब्ल्यूसी सदस्यांकडून राहुल गांधींच्या नावाला पसंती 2. काँग्रेस अध्यक्षपदावरून महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांमध्ये दुफळी, सोनिया गांधींच्या नेतृत्त्वावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनी माफी मागा, सुनिल केदार यांचा वरिष्ठ नेत्यांना इशारा 3. सुशांतच्या घरात भूत-प्रेतांचा वास साक्षीदार नीरज सिंहची तपास यंत्रणांना माहिती, आता सीबीआयकडून रिया चक्रवर्तीची चौकशी होण्याची शक्यता 4. पुढची घोषणा होईपर्यंत राज्यात ई-पास आवश्यक गृहमंत्री अनिल देशमुख यांचा माहिती; केंद्राच्या सूचनेला महाराष्ट्र सरकारचा प्रतिसाद नाही 5. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून मीडियाचे बुम सॅनिटाइज्ड, पुण्यातील जम्बो कोविड सेंटरच्या उद्घाटनानंतर अजित दादांची खबरदारी पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 24 ऑगस्ट 2020 | सोमवार | ABP Majha 6. राज्यातील मंदिरं उघडण्याची परवानगी द्यावी, मंदिरांवरही असंख्य लोकांची उपजीविका, सामनातून सुप्रीम कोर्टाला विनंती 7. जगभरातील कोरोना बाधितांचा आकडा 2.36 कोटींवर, गेल्या 24 तासांत 2.06 लाख नवे कोरोना बाधित तर 4235 रुग्णांचा मृत्यू 8. सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांसाठी खुशखबर, सोन्याच्या दरात गेल्या 15 दिवसांत चार हजारांची घसरण, दर 50 हजारांच्या खाली येण्याचे तज्ज्ञांकडून संकेत 9. लंडनमध्ये उपचार घेत असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ फरार घोषित, प्रत्यर्पणासाठी पाकिस्तानचे इंग्लंडला साकडे 10. उत्तर कोरियाचे हुकुमशाह किंग जोग उन कोमामध्ये, देशाचा कारभार बहिणीकडे सोपावला, दक्षिण कोरियाच्या नेत्यांचा दावाआणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
मुंबई
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement



















