एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 23 ऑक्टोबर 2019 | बुधवार | एबीपी माझा
#Latest News #Marathi News #Smart Bulletin राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये
-
- मतमोजणीसाठी उरले काही तास, प्रशासकीय यंत्रणा सज्ज, एबीपी माझावर सर्वात वेगवान निकाल
- यंदा दिवाळीवर पावसाचं सावट, 28 ऑक्टोबरपर्यंत पावसाचा हवामान खात्याचा अंदाज, मुंबई, पुणे, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता
- फटाक्यांची विक्री करण्याची परवानगी तडकाफडकी देता येणार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचं स्पष्टीकरण
- जेव्हीएलआर मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा, टँकरचा अपघात झाल्यानं मनस्ताप
- कुर्ल्यात पूर्व द्रुतगती मार्गावर संतप्त नागरिकांची पोलिसांवर दगडफेक, बेपत्ता मुलीचा शोध न लागल्यानं वडिलांची आत्महत्या, लोकांचा संताप अनावर
- पीएमसीप्रकरणी 30 ऑक्टोबरला निर्णय घेणार, खातेदारांचा पैसा सुरक्षित असल्याचा निर्वाळा देताना आरबीआयची माहिती, आझाद मैदानातलं आंदोलन मागे
- सोशल मीडियाचा दुरुपयोग टाळण्यासाठी धोरण आखा, सुप्रीम कोर्टाकडून केंद्र सरकारला तीन महिन्यांची मुदत, यूजर्सच्या खाजगी आयुष्यात ढवळाढवळ न करण्याच्याही सूचना
- स्वंयघोषित कल्की भगवानच्या आश्रमावर आयकर विभागाची छापेमारी, 600 कोटींची संपत्ती सापडली
- अक्षय कुमार आणि रितेशच्या हाऊसफुल चित्रपटामुळे ‘हिरकणी’ला थिएटर मिळेनात, मनसे कार्यकर्ते आक्रमक, थिएटर न मिळल्यास खळ्ळखट्याकचा इशारा
- टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय, दक्षिण आफ्रिकेचा एक डाव आणि 202 धावांनी धुव्वा, रोहित शर्माला मालिकावीर आणि सामनावीराचा बहुमान
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement