एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 22 ऑक्टोबर 2019 | मंगळवार | एबीपी माझा
#Latest News #Marathi News #Smart Bulletin राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये
1. 220 च्या आसपास जागा जिंकत राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता, एबीपी-सीव्होटरचा एक्झिट पोल, शिवसेनेच्या जागांमध्ये वाढ तर महाआघाडीला 60च्या आसपास जागा
2. महाराष्ट्रात सरासरी 60 टक्के मतदान, कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक तर ठाण्यात सर्वात कमी मतदान, कागल तालुक्यात रात्री साडेनऊपर्यंत मतदार रांगेत
3. कोल्हापुरातील कागल तालुक्यात रात्री 9.30 पर्यंत मतदान, 1300 मतदार असताना एकच ईव्हीएम, प्रशासनाच्या कारभारावर मतदारांची नाराजी
4. औरंगाबादेत जलील समर्थक आणि राष्ट्रवादी कार्यकर्ते भिडले, अमरावतीत स्वाभिमानीच्या उमेदवारावर गोळीबार, जालन्यात दोन गटात धक्काबुक्की
5. कोल्हापुरात राष्ट्रवादीचे उमेदवार हसन मुश्रीफ यांचा निकालापूर्वीच विजयी जल्लोष, रत्नागिरीतील दापोलीत संजय कदम यांची विजयी मिरवणूक
6. बँक कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा देशव्यापी संप, बँकांचं विलीनीकरण आणि इतर मागण्यासाठी कर्मचाऱ्यांचा एल्गार
7. एअर इंडियाच्या विक्रीसाठी केंद्र सरकार पुढील महिन्यात केंद्र सरकार निविदा मागवण्याची शक्यता, विमान कंपनीतील संपूर्ण हिस्सा विकण्याचा सरकारचा निश्चय
8. पीओकेतील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानचा तीळपापड, भारतावर अणुहल्ला करण्याची पाकच्या रेल्वेमंत्र्याची धमकी
9. स्वयंघोषित गुरु 'कल्की भगवान' यांचा पर्दाफाश, दक्षिण भारतील विजयकुमारच्या आश्रमांवर छापे, 44 कोटी रोख रक्कमेसह 500 कोटींची संपत्ती जप्त
10. रांची कसोटीत टीम इंडिया विजयाच्या उंबरठ्यावर; फॉलोऑननंतर दक्षिण आफ्रिकेची आठ बाद 132 अशी अवस्था, भारताला विजयासाठी केवळ दोन विकेट्सची गरज
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement