स्मार्ट बुलेटिन | 21 मे 2020 | गुरुवार | एबीपी माझा
एक जूनपासून सुरु होणाऱ्या 200 रेल्वेसाठी सकाळी 10 वाजल्यापासून बुकिंग सुरु, तर सोमवारपासून देशांतर्गत विमानांची भरारी पश्चिम बंगाल, ओदिशात अम्फान चक्रीवादळाचा कहर; 10 ते 12 मृत्युमुखी पडल्याची माहिती महाराष्ट्रातल्या कोरोना रुग्णांची संख्या 40 हजाराच्या उंबरठ्यावर, काल दिवसभरात 2 हजारांहून अधिक रुग्णांची वाढ
मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या 40 हजारांवर जाण्याची शक्यता, मंत्री जयंत पाटील यांचं वक्तव्य, मुंबईत काल दिवसभरात 1 हजार 372 कोरोनाबाधितांची नोंद दोन गज की दुरी, सत्ता की लालच बुरी म्हणत राष्ट्रवादीचा भाजपवर पलटवार, तर उद्यापासून सुरु होणाऱ्या भाजपच्या आंदोलनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे टार्गेटवर कर्नाटकनं सीमा बंद केल्यानं कोल्हापूर सीमेवर हजारो लोक, गुजरातहून आलेल्या पार्थिवावर साताऱ्यात अंत्यसंस्कार, ठाण्यात कोरोनाबाधित रुग्णाचा रस्त्यावर तडफडून मृत्यू पुढील वर्षीच्या जून-जुलैपर्यंत जगभरात कोरोना राहणार, अमेरिकन सुरक्षा संस्था पेंटागॉनच्या दस्तावेजांमध्ये गौप्यस्फोट जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा 51 लाखांच्या जवळ, 20 लाखांहून अधिक बरे झाले कोरोनानं महाराष्ट्रातला प्रसिद्ध लोककलावंत हिरावला, खंडेरायाच्या लग्नाला नवरी नटली फेम छगन चौगुलेंचं निधन अभिनेता जॅकी श्रॉफला हायकोर्टाचा दिलासा, आर्बिट्रेशनचा निकाल फेटाळून लावत भागिदारानं जॅकीला 35 लाख डॉलर देण्याचे हायकोर्टाचे आदेश
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ