स्मार्ट बुलेटिन | 20 सप्टेंबर 2020 | रविवार | ABP Majha
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

1. आरक्षण स्थगिती हटवण्यासाठी आज विविध ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाचा ठिय्या, तर मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी
2. वादाच्या भोवऱ्यात सापडलेली तीन कृषी विधेयकं आज राज्यसभेत मांडणार, मंजूर करुन घेण्याचं मोदी सरकारसमोर आव्हान
3. सहकारी आणि खासगी बँक कर्मचाऱ्यांना अटी-शर्थींसह लोकलनं प्रवास करण्याची मुभा, मध्य आणि पश्चिम रेल्वेची माहिती, क्यूआर कोडचं बंधन
4. कोरोनामुळं देश मोठ्या आर्थिक संकटात, देशावर तब्बल 101 लाख कोटींचं कर्ज!
5. राज्यभरात अनेक ठिकाणी पावसाची मुसळधार सुरुच, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात पिकं पाण्याखाली
6. देशाला सलग 30 वर्ष सेवा देणाऱ्या आयएनएस 'विराट'चा मुंबईहून गुजरातच्या दिशेनं अंतिम प्रवास
7. दिग्दर्शक अनुराग कश्यपवर अभिनेत्री पायल घोषकडून लैंगिक शोषणाचे आरोप, कंगनाचा पायलला पाठिंबा, राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल
8. सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी सीबीआयची टीम पुन्हा मुंबईत दाखल होणार, दिशा सॅलियन मृत्यू प्रकरणाचीही सीबीआय चौकशी करण्याची शक्यता
9. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी व्हाईट हाऊसवर विष पाठवल्यानं खळबळ, तपासणीदरम्यान विष हस्तगत
10. आयपीएलच्या तेराव्या हंगामाच्या पहिल्या सामन्यात गतविजेत्या मुंबईचा पराभव करत चेन्नईची विजयी सलामी
Before You Go
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
महत्त्वाच्या बातम्या






















