स्मार्ट बुलेटिन | 19 ऑक्टोबर 2020 | सोमवार | ABP Majha
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
1. पुढच्या 72 तासांत मुंबई, ठाण्यासह मराठवाड्यात पुन्हा अतिमुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाचा अंदाज, पुन्हा धाकधूक वाढली
2. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोन दिवसीय नुकसानग्रस्त भागांच्या दौऱ्यावर, आज सोलापूरला भेट देणार, तर फडणवीस बारामतीतून पाहाणी दौऱ्याला सुरुवात करणार
3. पुरग्रस्तांसाठी खासदारांसह पंतप्रधानांना भेटणार, मराठवाडा दौऱ्यात शरद पवारांची माहिती; आधी राज्यानं मदत द्यावी, नंतर केंद्राचं पाहू, बळीराजा नाराज
4. पुण्यात हवेली तालुक्यातील शिंदवणे घाटात ढगफुटीसदृश पाऊस, शिंदवणेसह इतर गावांतील 70 टक्के घरांमध्ये पाणी शिरलं, आजूबाजूच्या गावांनाही इशारा
5. हैदराबादमध्ये अस्मानी संकट कायम, तलावाचा बांध फुटल्यानं अनेक परिसर जलमय, रस्त्यांना नद्यांचं स्वरूप
पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 19 ऑक्टोबर 2020 | सोमवार | ABP Majha
6. फेब्रुवारी 2021 पर्यंत कोरोनाचं संकट आटोक्यात, सरकारनं स्थापन केलेल्या समितीचा दावा, रुग्णसंख्या 1 कोटी 6 लाखांच्या पुढे जाणार नसल्याचीही माहिती
7. राज्यपालांनी काही शब्द टाळायला हवे होते, भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना धाडलेल्या पत्रावर अमित शाहांची प्रतिक्रिया, संजय राऊतांकडून वक्तव्याचं स्वागत
8. महिलांच्या लोकल प्रवासासंदर्भात आज मुख्यमंत्री घोषणा करण्याची शक्यता, तर लॉकडाऊनपासून ठप्प असलेली मुंबई मेट्रो पुन्हा रूळावर
9. कॉक्स अँड किंग्सच्या अधिकाऱ्याचा मृतदेह टिटवाळा रेल्वे रूळावर सापडला, येस बँक घोटाळा प्रकरणाशी संबंध असल्यानं मृत्यूचं गूढ वाढलं
10. आयपीएलमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबकडून मुंबई इंडियन्सचा पराभव, क्रीडारसिकांनी अनुभवला सुपर ओव्हरचा थरार, लोकेश राहुलनं साकारली 77 धावांची खेळी
Before You Go
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
महत्त्वाच्या बातम्या






















