स्मार्ट बुलेटिन | 18 एप्रिल 2020 | शनिवार | एबीपी माझा
राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत घट; काल 118 नवे रुग्ण, राज्यातील आकडा 3320 वर जगभरात कोरोना बाधितांची संख्या 22 लाख पार, तर 1.5 लाखांहून अधिक मृत्यू; चीनमध्ये गेल्या 24 तासांत 1290 लोकांचा मृत्यू देशात कोरोना व्हायरसचा संसर्ग होण्याचा वेग मंदावला, आरोग्य मंत्रालयाची माहिती लॉकडाऊनसंदर्भात राज्य शासनाची नवी सर्वसमावेशक अधिसूचना जारी, कोरोनाचा प्रार्दुभाव नसलेल्या भागांमध्ये सूट मिळण्याची शक्यता
पाच महिन्यांसाठी महाराष्ट्राला दरमहा 10 हजार कोटींचे अनुदान द्या, अर्थमंत्री अजित पवार यांचे पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी यांना पत्र राज्याची आर्थिक घडी बसवण्यासाठी हालचाली सुरू; काही आर्थिक व्यवहारांना परवानगी लॉकडाऊनमुळे राज्यात बंद असलेली कापूस खरेदी 20 एप्रिलनंतर सुरू होणार, सहकारमंत्र्यांची माहिती सिनेकलाकारांच्या व्हॅनिटी व्हॅन आता खऱ्याखुऱ्या 'हिरों'साठी उपलब्ध, पोलिस कर्मचाऱ्यांना दिलासा ऊसतोड कामगारांना टप्प्याटप्प्याने घरी सोडणार , सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंची माहिती लातूरमध्ये अडकलेले साडेतेराशे महानुभावपंथीय घरी परतणार, राज्य सरकारकडून हिरवा कंदील
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News