एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 16 मे 2019 | गुरुवार | एबीपी माझा
राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये
1. एक्झिट पोलशी संबंधित ट्वीट तातडीने हटवा, निवडणूक आयोगाची ट्विटर इंडियाला सूचना, शेवटच्या टप्प्यात प्रचार शिगेला
2. पश्चिम बंगालमधील प्रचार आजच थांबणार, कोलकाता हिंसाचारानंतर निवडणूक आयोगाचा अभूतपूर्व निर्णय, तर ममता बॅनर्जींची जोरदार रॅली
3. लोकसभा निकालानंतर राज्यात मोठ्या फेरबदलाची शक्यता, राधाकृष्ण विखे, विजयसिंह मोहिते आणि जयदत्त क्षीरसागरांना भाजप-शिवसेनेकडून मोठी खाती
4. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'वर्षा'वर भेट, चारा छावण्या, जायकवाडी धरणाचं पाणी, दुष्काळाबाबत भेटीत चर्चा
5. पुलवामात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, दोन दहशतवाद्यांना कंठस्नान, एक जवान शहीद, पुलवामात संचारबंदी लागू
6. मान्सून 6 जूनला केरळमध्ये दाखल होणार, स्कायमेटनंतर भारतीय हवामान खात्याचा अंदाज, महाराष्ट्रातही पावसाचं आगमन उशिराने होणार असल्यानं बळीराजा चिंतेत
7. मुंबईच्या सचिन पवारचा न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये डंका, चिप्पा चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट बाल कलाकार पुरस्काराने सन्मान होणार
8. क्रिकेट विश्वचषकासाठी आयसीसी प्रत्येक संघासोबत अॅण्टी करप्शन अधिकारी नेमणार, इंग्लंडमधला विश्वचषक अधिक पारदर्शकपणे पार पडण्यासाठी निर्णय
9. 'पद्मश्री' परत करण्याचा विचार मनात होता, अरबाज खानच्या चॅट शोमध्ये अभिनेता सैफ अली खानची कबुली, पद्मश्री विकत घेतल्याच्या आरोपांवर सैफचं उत्तर
10. चंद्राचा आकार 50 मीटरने कमी झाल्याची नासाची माहिती, टायडल फोर्समुळे चंद्र पृथ्वीपासून दूर जात असल्याचाही दावा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
रायगड
Advertisement