एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
स्मार्ट बुलेटिन | 15 सप्टेंबर 2019 | रविवार | एबीपी माझा
#Latest News #Marathi News #Smart Bulletin राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये
राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये
1. युतीच्या दाव्यानंतरही शिवसेना-भाजप स्वबळाच्या तयारीत असल्याची शक्यता, दादरमध्ये भाजपकडून 288 जागांसाठी चाचपणी, तर आज शिवसेनेची मातोश्रीवर खलबतं
2. दिल्लीत सोनिया गांधी, शरद पवार आणि अमित शाहांमध्ये बैठक झाल्याचा प्रकाश आंबेडकरांच्या कार्यालयाचा दावा, बैठकीतील तपशील जाहीर करावा, वंचितचे शरद पवारांना आव्हान
3. उदयनराजे भोसले अखेर भाजपमध्ये दाखल, अमित शाहांच्या उपस्थितीत प्रवेश, आज पुणे आणि साताऱ्यात राजेंच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांचं शक्तीप्रदर्शन
4. विधानसभेला मनसेला सोबत घेणार नाही, मुंबई काँग्रेस अध्यक्ष एकनाथ गायकवाडांकडून स्पष्ट, तर मित्रपक्षांना 38 जागा सोडण्याची शक्यता
5. बारामतीत मुख्यमंत्र्यांचा पवार काका-पुतण्यावर हल्लाबोल, मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा राडा, पोलिसांचा सौम्य लाठीमार
6. पाकिस्तानने दहशतवादास खतपाणी घालणं न थांबवल्यास त्याचे तुकडे होणे अटळ, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे खडेबोल
7. मुंबई उपनगरासह ठाण्यात पहाटे मुसळधार पाऊस, नाशिकमध्ये गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग, गोदावरीच्या पाणीपातळीत पुन्हा वाढ
8. अमेरिकेवरील 9/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड लादेनचा मुलगा हमजा बिन लादेनचा खात्मा, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दुजोरा
9. सौदी अरेबियातील तेल विहिंरीवर ड्रोन हल्ले, अराम्कोमधील पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू कंपनी निशाण्यावर, परिसरात धुराचे लोण
10. भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान आजपासून टी-20 मालिकेला सुरुवात, धर्मशाळा मैदानावर संध्याकाळी 7 वाजता पहिला सामना
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
राजकारण
मुंबई
Advertisement