एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
स्मार्ट बुलेटिन | 14 मार्च 2020 | शनिवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये
- भारतात कोरोनाचा दुसरा बळी, दिल्लीत महिलेचा मृत्यू, देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 82 वर तर राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 19 वर
- महाराष्ट्रसह अन्य चार राज्यांमध्ये कोरोनामुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आल्याचं बनावट पत्र व्हायरल, पत्रावर विश्वास न ठेवण्याचं राज्य सरकारचं आवाहन
- पुणे, पिंपरीमधील शाळा, कॉलेजेस आजपासून बंद, मुख्यमंत्र्यांचे आदेश, तर मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूरातील जिम, जलतरण तलाव आणि सिनेमा-नाट्यगृह बंद राहणार
- घरी बसूनच काम करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन, वर्कफ्रॉम होमसाठी हायकोर्टातही याचिका, पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये शाळा-कॉलेजसना सुट्टी
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क, सॅनिटायझर अत्यावश्यक वस्तू, केंद्र सरकारकडून घोषणा, काळाबाजार करणाऱ्यांना 7 वर्षांची शिक्षा
- अमेरिकेत राष्ट्रीय आणीबाणी जाहीर, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय, कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी ट्रम्प यांच्याकडून 50 अब्ज डॉलरची तरतूद
- कोरोना व्हायरसमुळे भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय सामन्यांची मालिका रद्द, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे निर्णय
- येस बँकेच्या धसक्यानंतर सरकारी निधी राष्ट्रीयकृत बँकेत ठेवण्याचं राज्याचं धोरण, वेतन, पेन्शनसह सर्व योजनांची खाती 1 एप्रिलपासून राष्ट्रीय बँकेत
- मुंबई मेट्रोच्या कामासाठी 159 झाडं तोडण्याच्या प्रस्तावाला महापालिकेची मंजुरी, मेट्रो 2 आणि मेट्रो 7च्या कामाचा मार्ग मोकळा
- लंडनमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक उभारण्याचा मार्ग मोकळा, स्मारकाबाबतचा खटला महाराष्ट्राने जिंकला
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement