एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
स्मार्ट बुलेटिन | 14 जून 2019 | शुक्रवार | एबीपी माझा
#Latest News #Marathi News #Smart Bulletin राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये
1. बिश्केकच्या शांघाय सहकार्य संघटनेच्या संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडे कानाडोळा, डिनर टेबलवर एकत्र पण ना हस्तांदोलन, ना चर्चा
2. भाजप-शिवसेनेतील कलहामुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडल्याची चर्चा, आयारामांमुळे स्वपक्षीय नेते नाराज, मुख्यमंत्र्यांकडून सर्व आलबेल असल्याचा दावा
3. विधानसभेला आदित्य ठाकरेंसाठी शिवसेनेची जोरदार मोर्चेबांधणी, आदित्य मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असल्याचा शिवसेना नेत्यांचा दावा
4. मुंबईतील नायर रुग्णालयातून चोरीला गेलेलं पाच दिवसांचं बाळ सापडलं, बाळ चोरणारी महिलाही अटकेत
5. राज्यासह देशातील निवासी तसंच इंटर्न डॉक्टरांचं आज आंदोलन, कोलकात्यात डॉक्टरांना झालेल्या मारहाणीचा निषेध, रुग्णसेवेवर परिणाम होणार
6. पिंपरी चिंचवडच्या देहूरोड बाजारपेठेत भाजप नगरसेवकावर अज्ञातांचा गोळीबार, विशाल खंडेलवाल थोडक्यात बचावले
7. मद्य, मांस विक्रीविरोधात वारकर संप्रदाय आक्रमक, आषाढी यात्राकाळात सात दिवस मद्य आणि मासं विक्रीवर बंदी आणण्याची मागणी
8. 'मराठी भाषेच्या भल्यासाठी' साहित्यिक एकवटले, 24 जून रोजी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करणार
9. मीटू प्रकरणात अभिनेते नाना पाटेकरांना मोठा दिलासा, पाटेकरांविरोधात पुरावे नसल्याचा चौकशी अहवाल कोर्टात सादर, तनुश्री दत्ताचा तीव्र संताप
10. पावसामुळे भारत-न्यूझीलंडचा विश्वचषकातील सामना रद्द, प्रत्येकी एक गुणाची वाटणी तर भारत रविवारी पाकिस्तानशी दोन हात करणार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्रिकेट
भारत
राजकारण
Advertisement