एक्स्प्लोर
Advertisement
स्मार्ट बुलेटिन | 13 जून 2019 | गुरुवार | एबीपी माझा
देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा
1. वायू चक्रीवादळ गुजरातच्या वेशीवर, आज दुपारी गुजरात किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता, तब्बल 10 लाख लोकांचं स्थलांतर
2. मुस्लिम समाजासाठी मोदी सरकारचं महत्वाकांक्षी पाऊल, 5 कोटी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, तर तिहेरी तलाक विधेयकला मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत मंजुरी
3. राज्य सरकारचा शरद पवारांना मोठा धक्का, बारामतीला जाणारं नियमबाह्य पाणी रोखलं, 12 वर्षाचं पाप 12 दिवसांत धुतल्याचा रणजितसिंहांचा टोला
4. जम्मू काश्मीरमधील अनंतनागमध्ये पोलिस पथकावर दहशतवादी हल्ला, सीआरपीएफचे 5 जवान शहीद, 1 अतिरेकी ठार
5. गोव्यातील काँग्रेसचे 10 आमदार भाजपच्या वाटेवर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांचा गोप्यस्फोट , तर काँग्रेसचे आमदार फोडण्यासाठी भाजपकडून घोडेबाजार होत असल्याचा काँग्रेसचा आरोप
6. भिमा-कोरेगाव दंगल प्रकरणी शहरी नक्षलवादाचा आरोप असलेल्या गौतम नवलखांविरोधातील कागदपत्रांत काहीही आक्षेपार्ह नाही, मुंबई उच्च न्यायालयाचं मत
7. भारताच्या चांद्रयान-2 या मोहिमेची तयारी पूर्ण, 15 जुलैला पहाटे 2 वाजून 51 मिनिटांनी चांद्रयान 2 चं लॉन्चिंग होणार
8. चर्चगेटमध्ये होर्डिग कोसळून एकाचा मृत्यू तर वांद्र्यात स्कायवॉकचे पत्रे पडून 2 जखमी, पालिकेच्या मान्सूनपूर्व तयारीवर शंका
9. मुंबईकरांचं पाणी महागलं, पाणीपट्टीच्या दरात अडीच टक्क्यांनी वाढ , 16 जून पासून नवीन दरवाढ लागू होणार
10. विश्वचषकात भारत-न्यूझीलंड आमनेसामने, सामन्यावर पावसाचं सावट, शिखर धवनऐवजी कोण खेळणार याकडे चाहत्यांचं लक्ष
व्हिडीओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
अहमदनगर
Advertisement