1. ठाकरे सरकारचं खातेवाटप जाहीर, शिवसेनेला 18 तर, काँग्रेस-राष्ट्रवादीला प्रत्येक 15 खाती, 23 डिसेंबरला मंत्रीमंडळ विस्तार होण्याची शक्यता
2. बहुजनांचा पक्ष पुन्हा मूठभर लोकांचा करु नका, गोपीनाथ गडावरुन पंकजा मुंडेंची उघड नाराजी, पक्ष सोडणार नसल्याचे स्पष्ट, भाजप कोअर कमिटीतून मात्र बाहेर
3. गोपीनाथ मुंडेंच्या आदेशाने ज्यांना मोठं केलं, त्यांनीच छळ केला, एकनाथ खडसेंचा अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीसांवर निशाणा, पंकजा मुंडेंचा पराभव घडवून आणल्याच्या आरोपाचा पुनरुच्चार
4. पक्षाविरुद्ध कारवाया करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, एकनाथ खडसे-पंकजा मुंडेंची पक्षाबाबतची खदखद ऐकल्यानंतर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया
5. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी, लोकसभेत-राज्यसभेत मंजूर झालेलं विधेयकाचं कायद्यात रुपांतर, मोदी सरकारचा मोठा संकल्प मार्गी
6. हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून आयोगाची स्थापना; 6 महिन्यात अहवाल येणार
7. निर्भयाच्या दोषींना तातडीने फाशी देण्याच्या याचिकेवर आज सुनावणी, निर्भयाच्या आईकडून पटियाला हाऊस कोर्टात याचिका
8. अयोध्या प्रकरणातील सर्व 18 पुनर्विचार याचिका फेटाळल्या, सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाचा निर्णय
9. वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरची कोंडी फुटणार, एमएमआरडीए बदलणार हायवेचा चेहरामोहरा, प्रशासन नव्या विकासकामांसाठी 100 कोटींचा खर्च करणार
10. पुढील तीन दिवसात राज्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपिटीची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज