एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 12 जुलै 2019 | शुक्रवार | एबीपी माझा
#Latest News #Marathi News #Smart Bulletin राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये
1. महाराष्ट्राच्या आराध्य दैवताची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय पूजा, अहमदपूरच्या चव्हाण दाम्पत्याला पूजेचा मान, राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे, मुख्यमंत्र्यांचं साकडं
2. आषाढी एकादशीनिमित्त पंढरीत वैष्णवांचा मेळा, विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांच्या 10 किमीपर्यंत लांब रांगा तर वडाळ्याच्या प्रतिपंढरपुरात तावडेंच्या हस्ते पूजा
3. आषाढीच्या मुहूर्तावर सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर सुनावणी, तर सर्व वैद्यकीय प्रवेशासाठी या वर्षांपासूनच मराठा आरक्षण लागू, हायकोर्टाचा दिलासा
4. बंडखोरांच्या राजीनाम्यावर निर्णय घेण्यासाठी वेळ घेणार, कर्नाटक विधानसभा अध्यक्षांकडून भूमिका स्पष्ट, राजकीय नाट्य सुरूच राहणार
5. काँग्रेसमधून फुटलेले 10 आमदार भाजपमध्ये, बाबू कवळेकर, मायकल लोबो, बाबूश मोन्सेरात आणि फिलीप नेरी रॉड्रिग्ज मंत्रिपदाची शपथ घेणार
6. पुणे, नाशिक आणि कोकणात मुसळधार, महत्त्वाची धरणं ओव्हरफ्लो, तर तहानलेल्या मराठवाड्यात कृत्रिम पावासाच्या प्रयोगाचे मुख्यमंत्र्यांकडून संकेत
7. सततच्या पावसामुळे खेडमध्ये जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली, मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद, पुलावर पोलिस तैनात
8. मुंबईत नाल्यात पडून वाहून गेलेला दीड वर्षांचा दिव्यांश अजूनही बेपत्ता, महापालिका कर्मचारी, अग्निशमन दलाकडून शोधमोहीम सुरु
9. जगातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांच्या यादीत अक्षय कुमार एकमेव भारतीय, 444 कोटी रुपयांच्या मालमत्तेसह फोर्ब्जच्या यादीत अक्षय 33 व्या क्रमांकावर
10. ऑस्ट्रेलियाचा 8 विकेट्सनी धुव्वा उडवून इंग्लंडची फायनलमध्ये धडक; अंतिम सामना न्यूझीलंडशी, यंदा विश्वचषकाला मिळणार नवा विजेता
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
बातम्या
राजकारण
राजकारण
Advertisement