एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 11 ऑक्टोबर 2019 | शुक्रवार | एबीपी माझा
#Latest News #Marathi News #Smart Bulletin राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये
1. सत्तेसाठी नव्हे तर प्रबळ विरोधी पक्षासाठी मनसेला मत द्या, राज ठाकरेंचं आवाहन, सरकारने न्यायालयाशी संगनमत केल्याचा गंभीर आरोप
2. महाराष्ट्रात 222 जागा जिंकत काँग्रेसचा विक्रम मोडण्याचा अमित शाहांचा निर्धार, बालाकोटमध्ये कारवाईसाठी सैनिक गेले होते की मोदी? शरद पवारांचा खोचक सवाल
3. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या तीन तर मुख्यमंत्री फडणवीसांच्या आज सहा सभा, उद्धव ठाकरे विदर्भात तर संध्याकाळी राज ठाकरेंचं भांडुपमध्ये भाषण
4. काँग्रेस खासदार राहुल गांधी लातूरमधून विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करणार, 13 तारखेला औशासह मुंबईत दोन प्रचार सभा
5. वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरेंना आव्हान देणाऱ्या तीन उमेदवारांना निवडणूक आयोगाची नोटीस, दैनिक खर्च नोंद वह्या तपासणीसाठी सादर न केल्याने कारवाई
6. जे योग्य वाटलं ते केलं, यापुढेही करणार, राफेल विमान आणि लिंबू प्रकरणात संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांचं वक्तव्य
7. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर, तामिळनाडूत पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात दहशतवाद आणि व्यापारी संबंधांवर चर्चा होणार
8. जिओने फ्री आऊट गोईंग सेवा बंद केल्यानंतर वोडाफोन-आयडियाकडून फ्री कॉलिंगची घोषणा, कंपन्यांच्या स्पर्धेमध्ये ग्राहकांची चांदी
9. बिग बी अमिताभ बच्चन यांचा आज 77वा वाढदिवस, महानायकावर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव, मुंबईतील बंगल्याबाहेरही उत्साह
10. भारताची बॉक्सर मेरी कोम जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीत, सातव्यांदा अजिंक्यपद पटकावण्यासाठी सज्ज
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शेत-शिवार
भविष्य
महाराष्ट्र
भविष्य
Advertisement