देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...


1. बिहारमध्ये अटीतटीच्या लढतीत अखेर एनडीएची सरशी, 125 जागांसह बहुमत, 43 जागा जिंकणाऱ्या जेडीयूच्या नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता


2. 75 जागा मिळवत तेजस्वी यादव यांचा राजद बिहारमधील सर्वात मोठा पक्ष, मात्र सत्तेचं स्वप्न भंगलं, महागठबंधनला 110 जागा, मतमोजणीवर राजदचे गंभीर आक्षेप


3. बिहारमधील जनतेच्या आशीर्वादामुळे लोकशाहीचा पुन्हा विजय, पंतप्रधान मोदींचं ट्वीट तर अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनही बिहारच्या नागरिकांचे आभार


4. बिहार निवडणुकीने देशाच्या राजकारणाला तेजस्वी मोहरा दिला, सामनातून तेजस्वी यादवांवर स्तुतीसुमनं, शरद पवारांकडूनही तेजस्वींवर कौतुकाचा वर्षाव


5. 11 राज्यातील विधानसभा पोटनिवडणुकीतही भाजपची बाजी, 59 पैकी 41 जागांवर विजय, काँग्रेसच्या 31 जागा हिरवण्यात यश


6. यंदाचं हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय, 7 डिसेंबरपासून अधिवेशनाला सुरुवात


7. ड्रग्ज प्रकरणी अभिनेता अर्जुन रामपालला एनसीबीकडून समन्स, आज चौकशीची शक्यता, बॉलिवूडमधील कोणाकोणाची नावं समोर येणार याकडे लक्ष


8. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा फुलल्या, खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून खबरदारी घेण्याचं आवाहन


9. सोलापुरात मायलेकीच्या नात्याला काळीमा, अनैतिक संबंधांच्या आड येणाऱ्या आईचा मुलीकडून खून, मुलगी आणि तिच्या प्रियकराला बेड्या


10. मुंबई इंडियन्सला पाचव्यांदा आयपीएलचं विजेतेपद, अंतिम सामन्यात मुंबईची दिल्लीवर पाच विकेट्सनी मात, आयपीएल विजेता होण्याचं दिल्लीचं स्वप्न भंगलं