Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 10 फेब्रुवारी 2020 | सोमवार

1. हिंगणघाटच्या पीडितेचा अखेर मृत्यू, 7 दिवसांपासून पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी, आज सकाळी दोनदा पीडितेला हृदयविकाराचे झटके

2. निर्भयाप्रमाणे आरोपीच्या शिक्षेला वेळ नको, हिंगणघाटच्या पीडितेच्या कुटुंबियांची अपेक्षा, आरोपीला ताब्यात देण्याची मागणी

3. यापुढे तलवारीला तलवारीनं उत्तर, बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना राज ठाकरेंचा सज्जड दम, हिंदूंना सावध राहण्याचाही सल्ला

4. शिवसेनेला हिंदुत्व सिद्ध करण्याची गरज नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंक़डून मनसेच्या मोर्चाची खिल्ली, आजीवन हिंदुत्व सोडणार नसल्याचाही निर्धार

5.मराठी मुस्लिमांमुळे दंगली होत नाहीत, ते इथल्याच मातीतले, मनसेच्या महामोर्चात राज ठाकरेंचं वक्तव्य

पाहा व्हिडीओ :  स्मार्ट बुलेटिन | 10 फेब्रुवारी 2020 | सोमवार



6. भाजप म्हणजे हिंदू समाज नाही, संघाचे सरचिटणीस भैयाजी जोशींचं वक्तव्य, भाजपला विरोध म्हणजे हिंदूंना विरोध नसल्याचंही प्रतिपादन

7. पाकिस्तानातून मुंबईत 2 हजारांच्या बनावट नोटा, क्राईम ब्रँचची कारवाई, दुबईमार्गे नोटा मुंबईत आणल्याचं पोलिस तपासात उघड

8. अखेर दिल्ली विधानसभा मतदानाची टक्केवारी जाहीर, विलंब झाल्याने 'आप'कडून आक्षेप, 11 फेब्रुवारीला निवडणूक निकाल

9. यंदाच्या ऑस्कर सोहळ्याला सुरुवात, ब्रॅड पिटला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार, तर 'टॉय स्टोरी' 4 आणि 'हेअर लव्ह'ला अॅनिमेटेड विभागात पुरस्कार

10. बांगलादेशनं भारताला नमवून अंडर19 विश्वचषकावर पहिल्यांदाच कोरलं नाव, यशस्वी जैस्वालची झुंजार खेळी, रवी बिश्णोईची प्रभावी फिरकी व्यर्थ

एबीपी माझा वेब टीम