एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 5 जून 2020 | शुक्रवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
1. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अलिबाग दौऱ्यावर, चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार, तर राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेही रायगडचा दौरा करणार 2. आजपासून मिशन बिगिन अगेन सुरु होणार, मुंबईतही समविषम तारखेनं सर्व दुकानं खुली होणार, लॉकडाऊनमध्ये प्लंबर, दुचाकी मॅकेनिक्सला कामं करता येणार 3. 8 जूनपासून एमएमआर भागामध्ये प्रवासासाठी पासची गरज नाही, तर आजपासून दुचाकीवरून एकाला आणि कार, रिक्षामध्ये चालकासह दोघांना प्रवासाची परवानगी 4. कोरोनामुळे 65 वर्षांवरील कलाकारांना सेटवरती मज्जाव, मुख्यमंत्र्यांची चित्रीकरणाला सशर्त परवानगी, अट बदलण्यासाठी चित्रपट महामंडळाची मागणी 5. महाराष्ट्रात काल 2 हजार 933 कोरोना बाधितांची वाढ, सध्या 41 हजार 393 रुग्णांवर उपचार सुरु, देशातील कोरोना रुग्णांची संख्या 2 लाख 16 हजार पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 05 जून 2020 | शुक्रवार | ABP Majha 6. येत्या 2 ते 3 महिन्यांमध्ये कोरोनावरील औषध येणार, सीएसआयआरचे महासंचालक शेखर मांडे यांची माहिती, कोरोना चाचणीही स्वस्त होण्याची शक्यता 7. कोविड मृतदेहांशेजारी रुग्णांवर उपचार केल्याप्रकरणी आशिष शेलार यांची हायकोर्टात याचिका, राज्य सरकार आणि पालिका प्रशासनाला भूमिका स्पष्ट करण्याचे हायकोर्टाचे निर्देश 8. आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सर्व परीक्षा घेण्यास राज्यपालांची मंजुरी; लेखी परीक्षा 15 जुलै ते 15 ऑगस्ट दरम्यान, कोरोनामुळे यादरम्यान परीक्षा न झाल्यास 16 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर या कालावधीत होणार 9. जगभरात जवळपास 67 लाख लोकांना कोरोनाची लागण, गेल्या 24 तासांत 1 लाख 29 हजार नवे कोरोना बाधित, आतापर्यंत 32 लाख रुग्ण कोरोनामुक्त 10 जम्मू-काश्मीरमधील राजौरी भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, एका दहशतवाद्याचा खात्मा, संपूर्ण भागात सुरक्षा दलांकडून सीलअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
क्रीडा
बातम्या
फॅक्ट चेक
Advertisement