एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
स्मार्ट बुलेटिन | 31 जुलै 2019 | बुधवार | ABP Majha
दिवसभरात महत्तावाच्या बातम्यांचा वेगवान आढावा
![स्मार्ट बुलेटिन | 31 जुलै 2019 | बुधवार | ABP Majha ABP Majha Smart Bulletin 29th July 2019 स्मार्ट बुलेटिन | 31 जुलै 2019 | बुधवार | ABP Majha](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/07/31092857/Smart-Bulletin-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
स्मार्ट बुलेटिन | 31 जुलै 2019 | बुधवार | ABP Majha
-
- इंडियन मेडिकल असोसिएशनचा आज देशभरात बंद, लोकसभेत संमत झालेल्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयकाला विरोध, 45 हजार डॉक्टरांचं कामबंद आंदोलन
- 'कॅफे कॉफी डे' चे मालक व्ही. जी. सिद्धार्थ यांचा मृतदेह सापडला, 36 तासानंतर मंगळूरु येथील नेत्रावती नदीच्या पात्रात मृतदेह
- अखेर तिहेरी तलाकविरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर, मोदी सरकारचं ऐतिहासिक यश, तिहेरी तलाक देणाऱ्याला मुस्लिम पतीला तीन वर्षांची शिक्षा
- काँग्रेस-राष्ट्रवादीतल्या आयारामांचं आज भाजपत जंगी स्वागत, संध्याकाळी चार वाजता सोहळा, शिवेंद्रराजे, पिचड, संदीप नाईकांच्या राजीनाम्याने राष्ट्रवादीला मोठं भगदाड
- राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांच्या बंगल्यावर, नव्या राजकीय चर्चांना उधाण
- पश्चिम महाराष्ट्र, कोकणातलं पाणी मराठवाड्याच्या दिशेनं वळण्यासाठीच्या सर्व्हेला कॅबिनेटची मंजुरी, दीड महिन्यात सर्वे पूर्ण करण्याचं टार्गेट
- साताऱ्याच्या काशीळजवळ भीषण अपघात, एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू, सर्वजण धारवाडचे रहिवासी
- कृष्णा नदीची पातळी 35 फुटांवर पोहोचली, सांगलीला पुराता धोका, तर विदर्भातील अनेक नद्यांच्या पातळीत वाढ
- करोडो रुपये खर्चून बांधलेल्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमातळाच्या सिलिंगचा भाग कोसळला, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
- मुंबई महानगरपालिकेतील दांडीबहाद्दर नगरसेवकांना चाप बसणार, बायोमेट्रिक हजेरी सक्ती करण्याचा गटनेत्यांच्या बैठकीत निर्णय
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
क्रिकेट
क्रिकेट
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion