एक्स्प्लोर
Advertisement
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 29 जानेवारी 2020 | बुधवार
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
1. मालेगाव-देवळा रस्त्यावर एसटी आणि रिक्षाचा भीषण अपघात, अपघातातील मृतांचा आकडा 25 वर, तर 33 जखमी, मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखांची मदत
2. एनआरसी, सीएएच्या विरोधात बहुजन क्रांती मोर्चातर्फे आज भारत बंदची हाक, तर कुठल्याही बंदमध्ये सहभागी न होण्याचा व्यापारी संघटनेचा ठराव
3. मुंबईच्या नागपाड्यात सलग चौथ्या दिवशी मुस्लिम महिलांचा ठिय्या, एनआरसीविरोधात ठराव आणण्याची असदुद्दीन ओवेसींची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
4. कोरेगाव-भीमा प्रकरणात देवेंद्र फडणवीसांची उलट तपासणी करा, संजय लाखेंचा अर्ज, तपासावरुन चंद्रकांतदादांचा सरकारला इशारा, तर प्रकाश आंबेडकरांचं भाजपला आव्हान
5. देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार यांना जोरदार धक्का, अर्थमंत्री अजित पवारांकडून नागपूर, चंद्रपूरच्या वार्षिक योजनांना कात्री
6. शुक्रवारपासून सलग तीन दिवस बँका बंद, वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा संप, अर्थसंकल्पाच्या दिवशीही बँका बंद राहणार
7. नव्या घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी खूशखबर, फेब्रुवारीत ठाणे, नवी मुंबई, कल्याणमध्ये घरांसाठी म्हाडाची लॉटरी, ९ हजार घरांसाठी जाहिराती निघणार
8. मॅन वर्सेस वाईल्डच्या शूटिंगदरम्य़ान सुपरस्टार रजनीकांत जखमी, कर्नाटकातल्या बांदीपूर जंगलात शूटिंग सुरु असताना दुर्घटना
9. ऑस्ट्रेलियाला नमवत भारतीय संघ युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य फेरीत, अथर्व अंकोलेकर आणि यशस्वी जैस्वालची निर्णायक अर्धशतकी खेळी
10. भारत, न्यूझीलंड क्रिकेट मालिकेतील आज तिसरा सामना, किवींच्या देशात पहिल्या ट्वेन्टी-20 मालिका विजयाचं भारताचं लक्ष्य
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement