एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एबीपी माझा स्मार्ट बुलेटिन | 28 नोव्हेंबर 2019 | गुरूवार
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये
1. 20 वर्षांनंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार, शिवतीर्थावर संध्याकाळी उद्धव ठाकरेंचा शपथविधी, उद्धव ठाकरेंसोबत तीनही पक्षाचे प्रत्येकी 2 मंत्री आज शपथ घेणार
2. उद्धव ठाकरेंकडून पंतप्रधान मोदींना फोनवरुन आमंत्रण, तर सोनिया गांधी, मनमोहन सिंहांना आदित्य ठाकरे-मिलिंद नार्वेकरांनी दिलं निमंत्रण
3. उद्धव ठाकरेंच्या शपथविधीचं आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना निमंत्रण, राज्यभरातून 400 शेतकरीही येणार
4. उपमुख्यमंत्रीपदासाठी जयंत पाटलांचं नाव निश्चित, जयंत पाटलांसह छगन भुजबळ मंत्रिपदाची शपथ घेणार, तर पृथ्वीराज चव्हाणांकडे विधानसभेचं अध्यक्षपद सोपवण्याची शक्यता
5. उद्धव-राज भविष्यात एकत्र येतील, चंदूमामा वैद्य यांना विश्वास, शपथविधीसाठी राज ठाकरेंना निमंत्रण
6. महाराष्ट्र धर्माचं मर्म तपासा, सामनातून भाजपला खोचक टोला, तर, शिवसैनिकाला पालखीत बसवणार होतात ना? तरुणभारतमधून शिवसेनेला सवाल
7. जे झालं ते संपलं, आता नवीन सुरुवात करायची, राष्ट्रवादीच्या बैठकीत अजित पवारांचं वक्तव्य तर अजित पवार उपमुख्यमंत्री व्हावेत अशी राष्ट्रवादीच्या काही आमदारांची इच्छा
8. विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर सुप्रिया सुळेंकडून आमदारांचं स्वागत, आदित्य ठाकरे, अजितदादांची गळाभेट तर रोहित पवारांना आशीर्वाद, फडणवीसांना शुभेच्छा
9. सिंचन घोटाळ्याचे गाडीभर पुरावे रद्दीत, एकनाथ खडसेंचा फडणवीसांना खोचक टोला, सगळ्यांना सोबत न घेतल्यानंच पराभव झाल्याची खंत
10. गडचिरोलीत सहा नक्षल्यांचे आत्मसमर्पण, पोलिसांच्या नक्षलविरोधी अभियानाला अभूतपूर्व यश
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 28 नोव्हेंबर 2019 | गुरूवार | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्रिकेट
क्राईम
निवडणूक
Advertisement