1. आज विदर्भ आणि मराठवाड्यात, तर उद्या मध्य महाराष्ट्र आणि कोकणात अति मुसळधार पावसाचा इशारा काढणीला आलेली पिकं धोक्यात, शेतकऱ्यांसमोर आव्हान 


2. गुलाब चक्रीवादळाची लॅंडफॉलची प्रक्रिया रात्री पूर्ण, वाऱ्यांचा वेग ताशी 82 किमी, काही तासांतच चक्रीवादळाचं तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात रुपांतर होणार


3. आरोग्य विभागाच्या रद्द झालेल्या परीक्षा 15-16 किंवा 22-23 ऑक्टोबरला होण्याची शक्यता, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती, आजच्या बैठकीत अंतिम निर्णय 


4. धर्मांतराचं रॅकेट चालवत असल्याच्या आरोपाखाली नाशकातून आतिफ उर्फ कुणालला अटक, उत्तरप्रदेश एटीएसची कारवाई, आरोपीच्या खात्यात परदेशातून पैसे आल्यानं संशय बळावला 


5. आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या पुण्यातील दोन सट्टाबाजांना अटक, एक कोटींची रोकड हस्तगत, मार्केटयार्ड पोलिसांची कारवाई


पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 27 सप्टेंबर 2021 | सोमवार | ABP Majha



6. केंद्रीय कृषी कायदे आणि महागाईविरोधात आज शेतकरी संघटनांची भारत बंदची हाक; काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून पाठिंबा 


7. देशाच्या न्यायव्यवस्थेत महिलांना 50 टक्के आरक्षणाची गरज, देशाचे सरन्यायाधीन एन. व्ही. रवन्ना यांचं मोठं वक्तव्य 


8. देशात इंधन दरवाढीच सत्र सुरुच, सलग दुसऱ्या दिवशी डिझेलच्या दरांत वाढ, 4 दिवसांत 3 वेळा डिझेलच्या किमती वधारल्या 


9. अफगाणिस्तानात तालिबान्यांचा क्रूर चेहरा जगासमोर, दाढी कापणाऱ्यांना शरिया कायद्यानुसार शिक्षा देण्याचं फर्मान 


10. हर्षल पटेलच्या हॅट्रिकच्या जोरावर आरसीबीची मुंबई इंडियन्सवर 54 धावांनी मात, गुणतालिकेत रोहित शर्माचा संघ 7व्या स्थानी, तर प्लेऑफसाठी खडतर वाट