मुंबई : राज्यात दुसरी लाट हळूहळू ओसरताना दिसत आहे. राज्यात आज 3,206 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 292 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 64 हजार 027 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.24 टक्के आहे. कोरोना नियंत्रणात येत असतानाच राज्य सरकारने अनलॉकची प्रक्रिया सुरु केली आहे. 


राज्यात आज 36 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. परिणामी आतापर्यंत 1 लाख 38 हजार 870 रुग्णांनी कोरोनाने आपला जीव गमावला आहे. राज्यात सध्या कोरोनाचे 37 हजार 860 सक्रीय रुग्ण उपचार घेत आहेत.


मुंबईत गेल्या 24 तासात 479 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद 
मुंबईत गेल्या 24 तासात 479 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 481 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,18,002 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. सध्या मुंबईत 4667 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1208 दिवसांवर गेला आहे. 


पुण्यात गेल्या 24 तासात 171 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद 
पुण्यात गेल्या 24 तासात 171 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 196 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पुण्यात आतापर्यंत 48,9681 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या पुण्यात 1552 सक्रिय रुग्ण आहेत. तर 185 गंभीर रुग्ण उपचार घेत आहेत. 



देशातील कोरोनाची परिस्थिती
भारतात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढली आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, रविवारी सकाळी जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 28,326  नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 260 कोरोना रुग्णांनी जीव गमावला आहे. अशातच गेल्या 24 तासांत 26,032 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 


कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण तीन कोटी 36 लाख 52 हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 46 हजार 918 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, आतापर्यंत 3 कोटी 29 लाख 2 हजार रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. तर देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या तीन लाखांच्या जवळपास आहे. एकूण 3 लाख 3 हजार रुग्ण अद्यापही कोरोनावर उपचार घेत आहेत.