एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 27 ऑगस्ट 2019 | मंगळवार
दिवसभरात महत्तावाच्या बातम्यांचा वेगवान आढावा

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 27 ऑगस्ट 2019 | मंगळवार 1. गणेशोत्सवानंतर विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर होणार, 2014 प्रमाणे यंदाही 12 सप्टेंबरला घोषणेची शक्यता 2. विधानसभेच्या तोंडावर विनायक मेटे - पंकजा मुंडेंमधला वाद चव्हाट्यावर, मेटेंसोबत बीडमधील महाजनादेश यात्रेच्या रथावर जाणं पंकजांनी टाळलं 3. संजय दत्तच्या रासपमधील प्रवेशाबाबतचा महादेव जानकरांचा दावा खोटा, कोणत्याही राजकीय पक्षात सामील होणार नसल्याचे संजय दत्तचे स्पष्टीकरण 4. आर्थिक मंदीतून सावरण्यासाठी रिझर्व्ह बँकेचा केंद्र सरकारला मदतीचा हात, 1 लाख 76 हजार कोटींचा निधी ट्रान्सफर 5. एटीएममधून पैसे काढण्यावर निर्बंध येण्याची शक्यता, दोन व्यवहारांमध्ये सहा ते 12 तासांची मर्यादा आणण्याबाबत लवकरच निर्णय 6. देवदर्शन करुन परतणाऱ्या भाविकांच्या गाडीचा कर्नाटकातील कलबुर्गीजवळ भीषण अपघात, सोलापुरातील पाच जणांचा मृत्यू, तीन गंभीर जखमी 7. विनाअनुदानित शिक्षकांच्या आंदोलनाचा 22 वा दिवस, कालच्या लाठीहल्ल्याच्या विरोधात विधानभवन परिसरात शिक्षक आमदारांचं उपोषण 8. 'कडकनाथ' कुक्कुटपालनात शेतकऱ्यांची फसवणूक, आठ हजार गुंतवणूकदारांचे 500 कोटी अडकले 9. दिल्लीतल्या फिरोज शाह कोटला स्टेडियमला अरुण जेटलींचे नाव दिले जाणार, 12 सप्टेंबरला नामांतराचा कार्यक्रम 10. बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वातील स्पर्धक शिव ठाकरे आणि वीणा जगताप विवाहबंधनात अडकणार, माझाने विचारलेल्या प्रश्नावर वीणाची माहिती युट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK
आणखी वाचा























