स्मार्ट बुलेटिन | 25 जुलै 2021 | रविवार | एबीपी माझा
राज्यात पूर, दरड, घरं कोसळून 112 मृत्यू, 99 लोक बेपत्ता, सव्वा लाखांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं, सरकारची माहिती
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज चिपळूण दौऱ्यावर, चिपळूण बाजारपेठ आणि पूरग्रस्त भागाचा करणार पाहणी दौरा
आम्ही सर्वांचंच पुनर्वसन करू; मुख्यमंत्र्यांचा तळीये दुर्घटनाग्रस्तांना धीर, पुनर्वसनाची जबाबदारी म्हाडाने स्वीकारली, जितेंद्र आव्हाडांची घोषणा
सांगलीकर आणि कृष्णा नदी काठची धाकधूक आणखी वाढली, कृष्णा नदीची पाणी पातळी तब्बल 54.5 फुटांपर्यंत
मराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र, आरक्षणाची 50 टक्के मर्यादा शिथिल करण्यासाठी जोरदार मोहिम
राज्यात शनिवारी कोरोनामुळे 224 जणांचा मृत्यू; तर 6,269 नवीन रुग्णांची नोंद
दिवंगत राजीव सातव यांच्या मुलाला ICSE दहावी परीक्षेत 98.33 टक्के गुण! सुप्रिया सुळेंचं भावनिक ट्वीट
पॉर्न फिल्म प्रकरणात गुन्हे शाखेला राज कुंद्राच्या कार्यालयात छुपं कपाट सापडलं, मिळाली महत्वाची माहिती
ऑलिम्पिकमध्ये पीव्ही सिंधुची विजयी सुरुवात, मनु भाकर, यशस्विनी सिंह देसवाल यांचं आव्हान संपुष्टात
आज श्रीलंकेविरुद्ध पहिला टी20 सामना, वनडेनंतर टी20 मालिकेतही वर्चस्व गाजवण्यासाठी टीम इंडिया सज्ज