Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 24 जून 2021 | गुरुवार | ABP Majha
1. नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचं नाव देण्यासाठी आंदोलनाची हाक, नवी मुंबईकडे येणारे प्रमुख मार्ग बंद, पाच हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात
2. कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटने महाराष्ट्रासह आठ राज्यात हातपाय पसरले, बाधित रुग्णांचा आकडा 40 वर पोहोचल्याने चिंता वाढली, केंद्राकडूनही अलर्ट जारी
3. राज्यात मंगळवारच्या तुलनेत काल कोरोनाबाधित वाढले, 10 हजार 066 नवीन कोरोनाबाधितांची नोंद तर 11 हजार 032 जणांना डिस्चार्ज
4. नरेंद्र मोदी PM नाही EM अर्थात इव्हेंट मॅनेजर, कोरोना लसीकरणावरुन काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची जोरदार टीका
5. स्वस्त 5G बाबत मुकेश अंबानी नेमकी घोषणा करणार, याकडे देशाचं लक्ष, रिलायन्स समूहाच्या सर्वसाधारण सभेत मोठ्या निर्णयाची शक्यता
6. राज्यात बारावी परीक्षेच्या निकालाचे निकष दोन दिवसात ठरणार, शिक्षण मंत्र्यांची माहिती, दहावी आणि बारावीचे वर्ग सुरु करण्यासाठी एसओपीही तयार करणार
7. औरंगाबादमधील जमीन महसुलाच्या प्रकरणात राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा हायकोर्टात बिनशर्त माफीनामा, भविष्यात निर्देश देताना काळजी घेण्याचं आश्वासन
8. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी प्रमुख राज्यांच्या प्रदेशाध्यक्ष आणि प्रभारींशी चर्चा करणार, महाराष्ट्र काँग्रेसच्या स्वबळाच्या आग्रहावर खलबतं होण्याचीही शक्यता
9. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जम्मू काश्मीरमधील प्रमुख नेत्यांसोबत बैठक, कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच होणाऱ्या चर्चेकडे देशाचं लक्ष
10. भारताला नमवून न्यूझीलंडने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची गदा पटकावली, किवी संघाची टीम इंडियावर आठ विकेट्सनी मात