एक्स्प्लोर
Advertisement
Smart Bulletin : एबीपी माझा स्मार्ट बुलेटिन : 21 सप्टेंबर 2021 : मंगळवार : ABP Majha
देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा, महत्वाच्या दहा बातम्यांचा आढावा या स्मार्ट बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं.
एबीपी माझा स्मार्ट बुलेटिन 21 सप्टेंबर 2021
- 31 डिसेंबरपर्यंत राज्य मंत्रिमंडळातील भ्रष्ट मंत्र्यांवर कारवाई होणार, किरीट सोमय्यांचा इशारा तर पुढचं टार्गेट थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री
- महापालिका निवडणुकांसाठी मनसेची जोरदार तयारी, आजपासून अमित ठाकरे तर उद्यापासून राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर
- आजपासून तीन दिवस मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबईसह ठाणे, नवी मुंबईत रात्रभर मुसळधार पावसाची हजेरी
- सामूहिक बलात्कार झालेल्या परभणीतील 16 वर्षीय पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू, दोन आरोपींना बेड्या तर तिसरा आरोपी ताब्यात
- निकृष्ट बांधकामामुळे तीनमजली इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली, जळगावच्या पाचोऱ्यातील घटना, रिकामी इमारत असल्यानं सुदैवानं जीवितहानी नाही
- पॉर्न फिल्मप्रकरणी उद्योगपती राज कुंद्राला जामीन, दोन महिन्यानंतर जेलमधून आज बाहेर येणार, तपासात सहकार्य करण्याचे कोर्टाकडून निर्देश
- आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचा मृत्यू, हत्या की आत्महत्येच्या वादात संपत्तीचा मुद्दा समोर, सुसाईड नोटमधील शिष्य आनंद गिरीला अटक
- आज मुंबईत 316 पैकी केवळ 73 सरकारी आणि सार्वजनिक लसीकरण केंद्र सुरु राहणार, मर्यादित लससाठ्याअभावी निर्णय
- पुढील महिन्यापासून भारत पुन्हा इतर देशांना लसी पुरवणार, आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांची माहिती
- आयपीएलची सुरुवात बंगळुरूसाठी निराशाजनक, कोलकाता नाईट राडर्सचा बंगळुरुवर नऊ विकेट्सने विजय
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement