एबीपी माझा स्मार्ट बुलेटिन 21 ऑगस्ट 2019


1. माजी गृहमंत्री पी चिदंबरम् यांच्यावर अटकेची तलवार, ईडी आणि सीबीआयच्या टीमकडून शोध, चिदंबर यांना चौकशीसाठी तातडीनं हजर राहण्याची नोटीस



    1. राम जन्मभूमीचे महत्व मुस्लिम पक्षकारांनाही मान्य, जागा हिंदूंना देण्याबाबत मुस्लिम समाज सकारात्मक, रामललाच्या वकिलांचा दावा

    2. साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले भाजपच्या वाटेवर असण्याची चर्चा, उदयनराजेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

    3. शिवसेनेच्या वाटेवर असलेल्या भुजबळांच्या मनधरणीचे प्रयत्न, शरद पवारांनी भुजबळांना भेटीसाठी बोलावलं मात्र शिवसेनेतल्या ज्येष्ठ नेत्यांचा भुजबळांना विरोध

    4. राज ठाकरेंच्या चौकशीच्या दिवशी शक्तीप्रदर्शन करण्याचा मनसेचा निर्णय मागे, उद्या शांतता राखण्याचं राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन






6. राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळे ईशान्येकडील राज्य भारतात असल्याचा सरसंघसंचालक मोहन भागवतांचा दावा

7. ग्राहाकांच्या सोयीसाठी कामकाजाच्या वेळा बदलण्याचा बँकांचा प्रस्ताव, तर स्टेट बँकेकडून कर्जदारांसाठी मोठ्या सवलतींची घोषणा

8.फेसबुक, ट्विटरसह इतर सोशल मीडिया अकाऊंट्स आधारशी जोडणं गरजेचं, अॅटर्नी जनरल यांचं सुप्रीम कोर्टात विधान, गुगल-यूट्यूबला कोर्टाची नोटीस

9. पात्रता लढतीतील जोरदार विजयासह ऑलिम्पिक पदकविजेता सुशील कुमार जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघात

10. वेगवान गोलंदाज श्रीशांतवर आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी करण्यात आलेली आजीवन बंदी हटवली, पुढील वर्षी बंदी उठणार