एक्स्प्लोर
Advertisement
स्मार्ट बुलेटिन | 18 जुलै 2019 | गुरुवार | एबीपी माझा
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
स्मार्ट बुलेटिन | 18 जुलै 2019 | गुरुवार | एबीपी माझा
- आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून कुलभूषण यांच्या फाशीवरची स्थगिती कायम, गल्लीपासून दिल्लीपर्यंत जल्लोष, मात्र नव्यानं खटला सुरु होणार असल्यानं आव्हान कायम
- 26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदला अटक, आंतरराष्ट्रीय दबावानंतर पाकने टेकले गुडघे, हाफिजला भारताकडे सोपवण्याच्या मागणीला जोर
- आजपासून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे जनआशीर्वाद यात्रेवर, विधानसभेच्या तोंडावर जनतेशी जवळीक साधण्याचा सेनेचा नवा प्रयोग
- काँग्रेसचा कार्याध्यक्षच भाजपच्या वाटेवर असल्याचे चंद्रकांत पाटलांचे संकेत, तर चंद्रकांत पाटलांचं विधान हास्यास्पद, काँग्रेसच्या विश्वजीत कदमांचं उत्तर
- पीक विम्यासाठी सत्तेत असणाऱ्या शिवसेनेचा मुंबईत मोर्चा, 15 दिवसात शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचा इशारा, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे रस्त्यावर
- डोंगरीतील कोसळलेली केसरबाई इमारत म्हाडाचीच, पालिका आयुक्तांची स्थायी समितीला कबुली
- पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या संस्थेचं हरित पट्ट्यात बेकायदेशीर बांधकाम, आवश्यक परवानग्या सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
- मुंबईतील धोकादायक इमारतींच्या क्लस्टर पद्धतीने पुनर्विकासासाठी कायदा करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
- पन्हाळ्यावर दारु पित बसलेल्या टोळक्याला शिवराष्ट्र कार्यकर्त्यांनी दिला चोप, पावनखिंडीवरची सुरक्षा वाढवण्याची गरज अधोरेखित करणारी घटना
- कर्नाटक विधानसभेत आज कुमारस्वामींची विश्वासदर्शक ठरावाची परीक्षा, बंडखोर आमदारांना हजर राहण्याची सक्ती नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शिक्षण
बॉलीवूड
पुणे
भविष्य
Advertisement