एक्स्प्लोर
Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 12 ऑक्टोबर 2021 मंगळवार : ABP Majha
देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या स्मार्ट बुलेटीनमध्ये...
महत्वाच्या दहा बातम्यांचा आढावा या स्मार्ट बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
- कोरोनामुळं दीड वर्षांपासून बंद असलेली पुण्यातील कॉलेजेस आजपासून अनलॉक, दोन डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश, पर्यटन स्थळांसाठीचे निर्बंधही मागे
- मुंबई पोलिसांकडून आपल्यावर पाळत ठेवल्याचा समीर वानखेडेंचा आरोप, महाराष्ट्र पोलिसांकडे एनसीबीच्या झोनल डायरेक्टरची तक्रार
- शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक, आयकर विभागाच्या छापेमारीवर खलबताची शक्यता, तर निवडणुकांच्या रणनितीसाठी भाजप कोअर कमिटीची खलबतं
- बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणांच्या डोक्यावर कारवाईची टांगती तलवार, निवडणुकीत मर्यादेपेक्षा जास्त खर्च केल्याचा ठपका, आयोग सहा महिन्यांत कारवाई करणार
- अब्जाधीश गुंतवणूकदार राकेश झुनझुनवालांच्या आकासा एअर कंपनीला नागरी उड्डाण मंत्रालयाची परवानगी, काही दिवसांपूर्वीच घेतली होती पंतप्रधान मोदींची भेट
- वीजेचा दाब वाढल्यानं 600 हून अधिक घरातील टीव्ही, फ्रिजसह इतर उपकरणांचं मोठं नुकसान, सांगलीतल्या गणेशनगरमधली घटना, महावितरणविरोधात संताप
- महाराष्ट्रात काल नव्या कोरोना रुग्णांची संख्या घटली, गेल्या 24 तासात 1736 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
- जम्मू काश्मीरच्या पुंछ सेक्टरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत अधिकाऱ्यासह 4 जवान शहीद, शोपियानमध्ये भारतीय लष्करानं केला तीन दहशतवाद्यांचा खात्मा
- "बिग बॉसमध्ये जाण्यामुळे वारकरी संप्रदाय दुखावला असेल तर मी माफी मागते", कीर्तनकार शीवलिला यांनी मागितली माफी!
- आयपीएलमध्ये बंगळुरुचं आव्हान प्ले ऑफमध्ये संपुष्टात, कोलकात्याचा चार विकेट्सनी विजय, आता सामना दिल्लीसोबत
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement