देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या स्मार्ट बुलेटीनमध्ये...



1.धारावीसह मुंबईत ओमायक्रॉनचे तीन, तर पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी चार रुग्णांची नोंद, राज्यातल्या 17 रुग्णांसह देशातला आकडा 32 वर


2. पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही एमआयएमची रॅली मुंबईच्या दिशेनं रवाना, मुस्लिम आरक्षणासह वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन सरकारवर हल्लाबोल


MIM Rally In Mumbai LIVE  : मुस्लिम आरक्षण, वक्फ बोर्डाच्या जमिनी आणि इतर मागण्यांसाठी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्त्वाखाली एमआयएमची रॅली औरंगाबादहून मुंबईच्या दिशेनं निघाली आहे. मात्र या रॅलीला मुंबईत प्रवेश मिळणार नसल्याचं स्पष्ट झालंय. स्वतः राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना हे स्पष्ट केलं आहे. मुंबई पोलिसांनी काढलेला आदेश अंतिम समजायचा अशी प्रतिक्रिया गृहमंत्र्यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबईत राजकीय सभा आणि रॅलींना बंदी घालण्यात आलीय. त्यामुळं एमआयएमच्या रॅलीला मुंबईत एन्ट्री मिळणं कठीण दिसतंय. दरम्यान औरंगाबाद आणि अहमदनगर सीमेवर पोलिसांनी काही काळासाठी रॅली अडवली होती. मात्र अटी-शर्तींसह रॅलीतील काही वाहनं सोडण्यात आलीय.. 


3. परदेशातून आलेल्या प्रवाशांसाठी BMCकडून मोफत विलगीकरण व्यवस्था; पंचतारांकित हॉटेलचे दर जाहीर


BMC on Omicron : ओमायक्रॉन संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत दाखल होणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी मुंबई महापालिकेने विलगीकरणाची व्यवस्था केली आहे. भायखळा येथे मोफत व्यवस्था करण्यात आली असून ज्यांना तारांकित हॉटेलचा पर्याय निवडायचा आहे, त्यांच्यासाठी महापालिकेने दरपत्रकही जाहीर केले आहेत. मुंबई महापालिकेने ट्वीट करून ही माहिती दिली आहे. मुंबईत ओमायक्रॉनच्या संसर्गाचा फैलाव होऊ नये यासाठी महापालिकेकडून उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांच्या माध्यमातून संसर्ग फैलावू नये याचीही काळजी घेतली जात आहे. संसर्गाची उच्च जोखीम असलेल्या तीन देशांतून येणाऱ्या प्रवाशांना संस्थात्मक विलगीकरणाची आवश्यकता आहे. या प्रवाशांसाठी पालिकेने व्यवस्था केली आहे. 


4. नाशिकला आयटी हबचं रूप देण्यासाठी स्मार्ट सिटीच्या धर्तीवर विशेष कंपनी स्थापन करणार, केंद्राच्या मंजुरीमुळं महापालिकेच्या कामाला वेग


5.सरकारी पाहुणे येणार आहेत, गांधी गोऱ्यांशी लढले, आम्ही चोरांशी लढणार; नवाब मलिकांच्या ट्वीटने चर्चांना उधाण


6. पुण्यातल्या लक्ष्मी रोडवर आज नो व्हेईकल डे, वाहनांवर अवलंबून राहण्याचं प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांचा उपक्रम


7. एसटीच्या संपामुळं विद्यार्थिनीची शाळा गाठण्यासाठी घोडेस्वारी, बीडच्या माधवी कांगणेची जिल्ह्यात जोरदार चर्चा


8. एसबीआय बँकेची सर्व ऑनलाईन सेवा 12 डिसेंबरच्या पहाटेपर्यंत बंद राहणार, आयटी सेवा सुधारण्यासाठी काही काळ सेवा बंद करणार


9.बालकांमध्ये ऑनलाईन खेळांचं व्यसन वाढलं, केंद्राकडून पालक, शिक्षकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी 


10. बीसीसीआयमधील काही लोकांची मी भारतीय संघाचा प्रशिक्षक बनू नये अशी इच्छा, माजी प्रशिक्षक रवी शास्त्रींचा आरोप