Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 04 जानेवारी 2022 : मंगळवार : ABP Majha
देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या स्मार्ट बुलेटीनमध्ये...
दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
1. मुंबईत दररोज 20 हजार रुग्ण नोंदवले गेल्यास लॉकडाऊन, महापालिका आयुक्त इकबाल चहल यांची माहिती, गेल्या आठवडाभरात कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने चिंतेत भर
Mumbai Corona Update : सध्या देशासह राज्यातील कोरोनाचा आकडा वाढताना दिसत आहे. देशाच्या आर्थिक राजधानीचं सहर असलेल्या मुंबईतही कोरोनाचे आकडे वाढताना दिसत आहेत. जर मुंबईतील दैनंदिन कोरोनाबाधितांचा आकडा 20 हजारांच्या पार पोहोचला तर शहरात लॉकडाऊन सारखी कठोर पावलं उचलावी लागतील, असं मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलताना सांगितलं. तसेच मुंबईती दैनंदिन रुग्णांपैकी 80 टक्के रुग्ण ओमायक्रॉनचे असल्याचंही याच मुलाखतीत बोलताना इकबाल सिंह चहल यांनी स्पष्ट केलं.
मुलाखतीत बोलताना मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल म्हणाले की, "सध्या शहरात 30 हजार बेड उपलब्ध आहेत. मुख्यमंत्र्यांसोबतही मुंबईतील लॉकडाऊनबाबत चर्चा करण्यात आली आहे. सध्या कठोर निर्बंध लादण्याचा कोणताही विचार नाही. जर मुंबईत एका दिवसात 20 हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले, तर कठोर निर्बंध लादण्याबाबत विचार केला जाऊ शकतो. महत्त्वाचं म्हणजे, यामध्ये आधीप्रमाणे केवळ पॉझिटिव्हिटी दर नाहीतर रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची आणि बेड्सच्या उपलब्धतेची संख्याही लक्षात घेतली जाईल.
2. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन मुंबईत नवी नियमावली; रुग्ण आढळल्यास अख्खा मजला सील करणार, तर दहापेक्षा अधिक रुग्ण आढळल्यास पूर्ण इमारत सील
3. कोरोनानं पुन्हा विद्यार्थ्यांची वाट अडवली, मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातल्या शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद, मात्र दहावी-बारावीचे वर्ग सुरु राहणार
4. ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वाढल्यानं सचिव स्तरावरच्या केंद्रीय कर्मचाऱ्यांची 50 टक्के उपस्थिती, दिव्यांग आणि गर्भवती महिलांना वर्क फ्रॉम होमची मुभा
5. एमपीएमससीची पूर्व परीक्षा आता 23 जानेवारीला, तीन परीक्षांचं सुधारित वेळापत्रक जाहीर, तर एमपीएससी परीक्षेमुळं म्हाडाच्या परीक्षाही पुढे ढकलल्या
पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 04 जानेवारी 2022 : मंगळवार
6. गोव्यात शिवसेना-काँग्रेस आघाडीसाठी खलबतं, माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत आणि संजय राऊतांमध्ये बैठक, शिवसेनेनं 7 जागांची मागणी केल्याची माहिती
7. दक्षिण मुंबईला थेट रायगडशी जोडणाऱ्या शिवडी- न्हावाशेवा प्रकल्पाचं काम वेगात, 22 किलोमीटर लांबीच्या पुलाचं 63 टक्के काम पूर्ण, एबीपी माझावर पहिली झलक
8. मुंबईत घरमालक पती-पत्नीकडून 69 वर्षीय नोकराची हत्या, बारा वर्षीय मुलीची छेड काढल्याचा आरोप, फरार होण्याआधी आरोपींना बेड्या
9. 'बुली बाई' अॅप प्रकरणी पहिला आरोपी ताब्यात, मुंबई पोलिसांच्या सायबर सेलची कारवाई
10. जोहान्सबर्ग कसोटीत भारताचा पहिला डाव 202 धावांत आटोपला, आज गोलंदाजांच्या कामगिरीकडे लक्ष