Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 01 जुलै 2021 | गुरुवार | ABP Majha


 



  1. आजपासून महत्त्वाच्या बँकांच्या व्यवहारांत मोठ्या बदलांची अमंलबजावणी; दागिन्यांना आयडी कोड मिळणार, तर वाहनं आणि सिलेंडरचे दर बदलण्याची चिन्ह


 



  1. सोलापुरात भाजप नेते गोपिचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक करणारा तरुण कॅमेऱ्यात कैद, पोलिसांच्या आश्वासनानंतर पडळकर समर्थकांचं आंदोलन मागे


 



  1. पहाटे शपथविधी उरकताना जवळचे वाटणारे अजित दादा आता भाजपच्या निशाण्यावर, सीबीआय चौकशीसाठी चंद्रकांत पाटलांचं गृहमंत्री अमित शहा यांना पत्र


 



  1. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा दुसरा हफ्ता लवकरच मिळणार


 



  1. मुंबईत आज लसीकरण बंद राहणार; पुरेसा लससाठा उपलब्ध नसल्याने प्रशासनाचा निर्णय


 




  1. पंढरीची पायी वारी झाली तर देशातील नव्हे जगातील कोरोना नामशेष होईल, अजब वक्तव्यामुळे शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे पुन्हा एकदा चर्चेत


 



  1. संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज यांच्या पालख्यांचं प्रातिनिधीक प्रस्थान, सोहळ्यासाठी 50 वारकऱ्यांना परवानगी; तर आजपासून एबीपी माझावर ‘माझा विठ्ठल माझी वारी’ विशेष कार्यक्रम


 



  1. आषाढी यात्रेच्या तोंडावर पंढरपूरमधील कोरोना रुग्णसंख्येत वाढ, काल दिवसभरात 117 कोरोनाबाधित रुग्ण आढळले, प्रशासनाच्या चिंतेत भर


 



  1. राज्यात पुन्हा वाढतोय कोरोनाबाधितांचा आकडा, काल दिवसभरात 9 हजार 771 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद


 



  1. कोरोनाकाळात देवदुतांची भूमिका बजावणाऱ्या डॉक्टरांचा एबीपी माझा करणार सन्मान, ‘डॉक्टर्स डे’निमित्त दिवसभर विशेष कार्यक्रमांचं आयोजन