एक्स्प्लोर

Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 01 जानेवारी 2022 : शनिवार : ABP Majha

दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.

१. कोरोनाच्या सावटात नववर्षाचं जगभरात जल्लोषात स्वागत, नववर्षाच्या पहिल्या दिवशी एबीपी माझावर घरबसल्या देवदर्शन

New Year 2022 Celebration in Maharashtra Temple : नवी स्वप्न आणि आशाआकांक्षांसह नववर्षाचा सूर्योदय झाला आहे. जगभरात नववर्षाचं जल्लोषात स्वागत केलं जातंय. एकीकडे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात झालीय. संकट वाढल्यानं मंदिरात गर्दी टाळणं गरजेचं आहे. मात्र तरीही राज्यभरातील प्रमुख मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. 

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी भाविकांनी शिर्डीत मोठी गर्दी

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी भाविकांनी शिर्डीत मोठी गर्दी केली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काल रात्री 9 वाजता मंदिर बंद करण्यात आलं होतं. आज सकाळी 6 वाजेपासून साईदर्शन पुन्हा झालंय.  कडाक्याच्या‌ थंडीतही भाविक साई दर्शनासाठी आतूर आहेत. नववर्षानिमित्ताने साई मंदिरात आकर्षक फुलांची सजावट कऱण्यात आली आहे.  जमावबंदीचे आदेश धुडकावत भाविकांचा जल्लोष यावेळी पाहायला मिळाला. साई मंदिर परिसरात प्रवेश बंदी असताना रस्त्यावर भाविकांची‌ गर्दी आहे.  साई मंदिर बंद असल्याने भाविकांचा हिरमोड होताना दिसून येतोय.

२. लहान मुलांच्या लसीकरणासाठी आजपासून कोविन अॅपवर नोंदणी, १५ ते १८ वयोगटातील मुलांचं ३ जानेवारीपासून लसीकरण, सध्या कोव्हॅक्सिन लशीचा पर्याय

३. नववर्षाचा पहिला दिवस अन्नदात्याला समर्पित; 10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर 20 हजार कोटी हस्तांतरित होणार

४. राज्यात काल दिवसभरात ८ हजारहून अधिक रुग्ण, मुंबईतील बाधितांचा आकडा ५ हजारहून अधिक, ७० टक्के रुग्णांमध्ये डेल्टा व्हेरियंट आढळल्यानं चिंतेत वाढ

५. पुण्यातील आंबेगाव आणि मावळ तालुक्यातील बैलगाडा शर्यती रद्द, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

६. कटराच्या वैष्णो देवी मंदिर परिसरात चेंगराचेंगरी, २ महिलांसह १२ भाविकांचा मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना २ लाख तर जखमींना ५० हजारांची मदत जाहीर

Stampede at Mata Vaishno Devi Bhawan: जम्मू (Jammu)मधील कटरा (Katra) येथील वैष्णोदेवी मंदिरामध्ये रात्री झालेल्या चेंगराचेंगरीत 12 भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींवर नारायणा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी वैष्णो देवी मंदिरात भाविकांची गर्दी झाली होती. रात्रीच्या सुमारास अचानक गोंधळ झाल्यानं चेंगराचेंगरी झाली.  पंतप्रधान मोदी यांनी या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे.  सरकारकडून दुर्घटनेत मृत पावलेल्या भाविकांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये प्रत्येकी तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत घोषित केली आहे. शिवाय मदतीसाठी हेल्पलाईन नंबर देखील जारी करण्यात आला आहे.  

७. भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिनानिमित्त देशाच्या कानाकोपऱ्यातून आंबेडकरी अनुयायी दाखल, अजित पवार, प्रकाश आंबेडकरांकडून अभिवादन, पोलिसांचा फौजफाटा तैनात

८. समृद्ध महाराष्ट्र, बलशाली भारत घडवण्यासाठी एकजूट होऊया, आव्हानांवर मात करूया; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आवाहन

९. नव्या वर्षाची सुरुवात नव्या नियमांसह, एटीएममधून पैसे काढणं महागणार, जीएसटी दर वाढल्याने चपलाही महाग, आरक्षण नियमातही बदल

१०. दक्षिण आफ्रिकेतील एकदिवसीय क्रिकेट मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर, अनफिट रोहित शर्माच्या गैरहजेरीत के. एल. राहुलकडे कर्णधारपद, जसप्रीत बुमरा उपकर्णधार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 07 July 2024Navi Mumbai Rain Special Report : मुसळधार पावसानं नवी मुंबईला अक्षरश: धुतलंDada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
Embed widget