Mumbai : राज्याच्या विविध भागात परतीचा पाऊस (Rain) कोसळत आहे. या पावसामुळं अनेक ठिकणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. यामुळं राज्यातला बळीराजा पुरता कोलमडलाय. दिवाळी सणाच्या मुहूर्तावर शेतकऱ्यावर आस्मानी संकट कोसळलय. शेतकऱ्यांच्या पिकात सगळीकडं पाणीच पाणी झालंय. त्यामुळं हाती आलेला घास या पावसानं हिरावून घेतलाय. त्यामुळं पुरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मदत करा असं आवाहन महाराष्ट्रातील (Maharashtra) संवेदनशील जनतेला 'एबीपी माझा'च्या (ABP MaJha) वतीनं करण्यात आलंय. पूरग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत करुन 'माणुसकीची दिवाळी' साजरी करावी, असं आवाहन एबीपी माझाच्या वतीनं करण्यात आलंय.


पुरानं उद्धवस्थ झालेल्या शेतकऱ्यानं अनुभवली माणुसकीची दिवाळी


एबीपी माझानं औरंगाबादमधील पुरानं उद्धवस्थ झालेल्या शेतकऱ्याची बातमी दाखवली होती. यावेळी शेतकरी कुटुंबातील ऋषिकेश चव्हाण या चिमुकल्याशी केलेल्या संवादाचा व्हिडीओ देखील प्रचंड व्हायरल झाला आहे. गंगापूर तालुक्यातील बुट्टेवडगाव गावातील चव्हाण कुटुंबातील व्यथा 'एबीपी माझा'ने दाखवली होती. माझाच्या या बातमीनंतर औरंगाबादच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्याला महाराष्ट्रातून मदतीचा हात मिळत असून, त्यांची दिवाळी गोड झाली आहे. या शेतकऱ्यानं माणुसकीची दिवाळी अनुभवली आहे. हे दृष्य पाहून शेतकऱ्याचा लहान मुलगा ऋषीकेश चव्हाणच्या डोळ्यात अश्रू आल्याचं पाहायला मिळालं.



पावसानं पिकं हिरावल्यानं शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात 


काल एबीपी माझानं दाखवलेल्या एका बातमीनं महाराष्ट्र गहिवरला आहे. राज्यभर दिवाळीचा उत्साह असताना राज्यातल्या काही भागात शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत. पावसानं पीक हिरावल्यानं शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात आहे. औरंगाबादमधल्या शेतकऱ्याची अशी वेदनादायी कहाणी काल माझानं दाखवली आणि अनेकांचं ह्रदय हेलावलं. शेतकऱ्याच्या मुलाच्या शब्दांनी सुन्न झालेल्या दानशूर व्यक्तींनी तातडीनं या शेतकऱ्याला मदतीचा हात दिला. या ओलाव्यानं शेतकरी कुटुंबही गहिवरलं. आज माझाची टीम या शेतकऱ्याच्या घरी मदत घेऊन पोहोचलीय.


किमान एका कुटुंबाची दिवाळी गोड करावी


पुरामुळं हजारो कुटंबं उद्धवस्थ झाली आहेत. ज्याला आपण जगाचा पोशिंदा म्हटलं जातं तो शेतकरी आज संकटात आहे. त्यामुळं महाराष्ट्रानं आपला दानशूरपणा, संवेदनशीलपणा वेळोवेळी दाखवून दिला आहे. त्यामुळं आता देखील जनेतला एबीपी माझानं शेतकऱ्यांना मदतीचं, त्यांची दिवाळी गोड करण्याचं आवाहन केलं आहे. किमान एका कुटुंबाची दिवाळी गोड करावी असं आवाहन एबीपी माझानं केलं आहे. शेतकऱ्यांच्या मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचं काम आपण करावं. अडचणीच्या काळात शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करुयात. किमान एका कुटुंबाला आपण एकत्रीत येऊन मदत करुयात असं आवाहन एबीपी माझानं केलं आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:  


ABP Majha Impact: 'माझा'च्या बातमीनंतर औरंगाबादच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्याला महाराष्ट्रातून मदतीचा हात