दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.


1. देशभर धनत्रयोदशीचा उत्साह, सोने स्वस्त झाल्याने सराफा बाजारात गर्दी होण्याची शक्यता


2. तरुणाईला मिळणार नोकऱ्यांचं दिवाळी गिफ्ट, रोजगार मेळ्यातून 75 हजार तरुणांना पंतप्रधान मोदी सोपवणार नियुक्तीपत्र, तर राज्यात आरोग्य विभागात 10 हजार पदांची भरती होणार


3. तीन वर्षांनी पर्यटकांसाठी नेरळ-माथेरान मिनी ट्रेन पुन्हा रुळावर, सकाळ-संध्याकाळ प्रत्येकी दोन फेऱ्या


4. मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यातच आनंदाचा शिधा किटमध्ये काळाबाजार झाल्याचा आरोप,  किटसाठी 300 रुपये घेत असल्याचा दावा, माझाच्या बातमीनंतर अन्न पुरवठा विभागाच्या पथकाकडून चौकशी


मुख्यमंत्र्यांच्या ठाणे शहरात  (Thane Firing News) एकाच दिवशी दोन गोळीबाराच्या घटना घडल्याने प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. मात्र ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी देखील बारा तासांच्या आत दोन्ही घटनांची गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. धक्कादायक म्हणजे दोन्ही घटनांचे गुन्हेगार एकच आहेत. ठाण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाणे पोलिसांनी केलेल्या कामगिरी बद्दल माहिती दिली. 


5. पुण्यात दहा लाख रुपये किमतीचे सेक्स टॉईज जप्त, लष्कर पोलीस ठाण्याची कारवाई, एकावर गुन्हा दाखल


 



6.  मुकेश अंबानींचे पुत्र अनंत अंबानी उद्धव ठाकरेंच्या भेटीला, दिवाळीनिमित्त सदिच्छा भेट असल्याची माहिती


7. बदलापूर जवळच्या कोंडेश्वर धबधब्यात चार मुलं बुडाली, चौघेही घाटकोपरहून सहलीसाठी आल्याची माहिती


8. परतीच्या पावसाचा मराठवाड्याला तडाखा, पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांच्या दिवाळ सणावर विरजण 


राज्यात परतीच्या पावसानं (Rain) धुमाकूळ घातला आहे. या पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांच्या (Farmers) उभ्या पिकात पाणी साचल्यानं हाती आले पिकं वाया गेलं आहे. त्यामुळं शेतकरी संकटात सापडला आहे. या परतीच्या पावसाचा सर्वाधिक फटका मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना बसला आहे. तसेच अहमदनगर, नाशिक याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत देखील शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. 


9.  इस्रो रॉकेट LVM3 M2 तयार, लाँच करणार 36 सॅटेलाइट, रात्री 12 वाजता सुरु होणार काउंटडाउन


10. टी 20 विश्वचषकाचा महामेळा आजपासून... सुपर-12 च्या लढाईत ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडचा सामना, इंग्लंड आणि अफगाणिस्तानही भिडणार