Chetan Shashital Majha Maha Katta : "आवज ही एक साधना आहे. आपल्या श्वसन प्रक्रियेवर आपला ताबा पाहिजे. आपण जे बोलतो ते समोरच्या व्यक्तीच्या कानातून त्याच्या शरीरात पोहोचते. आवाजाची स्वत:ची एक ताकद आहे. नाभिवर ताबा मिळवला की तुम्ही आवाजावर ताबा मिळवू शकता. तुमच्या ब्रिदिंगवर ताबा मिळवला की आवाजावर देखील ताबा मिळवता येतो, अशी माहिती आवाजाचे जादूगार चेतन सशितल यांनी एबीपी माझाच्या (ABP MAJHA) 'माझा कट्टा" (Maha Katta) या कार्यक्रमात बोलताना दिली.  


एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमाला दहा वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून एबीपी माझाने महाकट्ट्याचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील दहा दिग्गज मान्यवरांशी संवाद साधण्यात आला. आवाजाचे जादूगार चेतन सशितल यांच्यासोबत देखील एबीपी माझाच्य महाकट्ट्यामध्ये संवाद साधला. चेतन सशितल यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह अनेक दिग्गजांचे आवाज काढले आहेत.


शाळेपासूनच चेतन सशितल यांना  आवाजाची कला अवगत झाली. आवाजावर हुकूमत कशी मिळवली? याबाबत सांगताना ते सांगतात, "शाळेत असताना मी आवाज बदलू शकतो हे माहिती होते. मी वर्गशिक्षकांचे आणि माझ्या सहकाऱ्यांचे आवाज काढायचो. पण त्यावेळी असा विचार केला नव्हता की आवाज ही आपली पॅशन होईल. नंतर कंठ फुटल्यानंतर लक्षात आलं की आपण कोणाचाही आवाज काढू  शकतो. सायन्सचा विद्यार्थी असल्यामुळे त्यावेळी मी विचार देखील सायन्टिफिक करायचो की आवाजाची प्रक्रिया काय आहे? नाभीचे काय काम आहे. तेव्हापासून मी यावर संशोधन करत होतो. ही कला सर्वांनाच साध्य होईल असे नाही. परंतु, आवाजाचे व्यायाम केल्यानंतर ही साध्य होणारी कला आहे.

चेतन सशितल सांगतात, आवाज ही माझी उर्जा आहे. अनेक प्रयत्न करून मी ही उर्जा मिळवली आहे. त्यासाठी खूप वेळ दिला आहे. परंतु, आजकाल आपण स्वत:ला वेळ देत नाही. अलीकडील तरुण पिढी तर मोबाईलमध्ये गुंतलेली आहे. हातात सतत मोबाईल आणि कानात हेडफोन घातलेले अनेक तरुण पाहायला मिळतात. परंतु, हेडफोनमुळे आपल्या ऐकण्यावर परिणाम होतो." 
 
गेल्या दोन-अडीच वर्षांपासून संपूर्ण जगावर कोरोनाचे सावट आहे. याममध्ये अनेकांचे नुकसान झाले आहे. तसेच आवाजाच्या क्षेत्रातील लोकांना देखील कोरोनाचा फटका बसला आहे. याबाबत बोलताना सशितल सांगतात, "कोरोनामुळे अनेकांचे स्टूडिओ बंद पडले. परंतु, याच काळात आर्टिफिशल इंटेलिजन्स आले. या तंत्रज्ञाच्या माध्यमातून संगणकात आवाज सेव्ह करून ठेवले जात असत.  त्यामुळे या क्षेत्रातील लोकांना वाटले की आता आपले काय होणार?  परंतु, संगणकाच्या आवाजात भावना नसतात. त्यामुळे या तंत्रज्ञानाचा फारसा परिणाम झाला नाही." 


महत्वाच्या बातम्या