एक्स्प्लोर

माझा इम्पॅक्ट: खैरेंच्या खासदार निधीची उपजिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशी

औरंगाबाद: औरंगाबादचे शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांच्या खासदार निधीची चौकशी सुरू आहे. खैरेंनी कन्नड तालुक्यात आपला खासदार निधी अस्तित्वात नसलेल्या गावांवर खर्च केल्याची बातमी एबीपी माझानं दाखवली होती. माझाच्या या बातमीनंतर कन्नड उपजिल्हाधिकारी यांनी गावागावात या निधीबाबत चौकशी सुरु केली आहे. काय होतं नेमकं प्रकरण? औरंगाबादचे शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी अस्तित्वातच नसलेल्या गावासाठी खासदार निधी खर्च केला. खैरे यांनी कन्नड तालुक्यात त्यांचा खासदार निधी अस्तित्वात नसलेल्या गावात खर्च केल्याची माहिती मिळाल्यानंतर आम्ही त्या गावाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण आम्हालाही अपयश आलं. शेवटी आम्ही देभेगावात पोचलो, जिथे खासदार खैरे यांच्या खासदार निधीतून 2015-16 साली तीन लाख रुपयांची 9 कामं झाली आहेत. ज्याची किंमत आहे 27 लाख रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. या गावात गुरुद्वारा आणि जिल्हा परिषदेच्या शाळेसमार नाली बांधण्यात आली. पण इतर ठिकाणी मात्र काहीच काम झालेलं नाही. शनी मंदिराचं पाणी रस्त्यावर आहे. हनुमान मंदिरासमोरील नाली दिसतच नाही. तर गावातील अनेकांच्या घरासमोर नालीचं पाणी आहे. आम्ही जिल्हा परिषद आणि गुरुद्वारासमोर असलेली नाली मोजली. ती केवळ 450 फूट भरली. या गावात खैरे यांच्या खासदार निधीतून सगळा खर्च एकत्र केला, तर 450 फूट लांबीच्या नालीसाठी त्यांनी तब्बल 27 लाख खर्च केले, असं गृहीत धरुन प्रत्येक फुटासाठी 6 हजार खर्च रुपये खर्च येईल. पुढे आम्ही खासदार निधी खर्च केलेल्या कन्नड तालुक्यातील आलापूर गावात गेलो. आलापूर हे विस्थापित गाव आहे. इथे गेल्या 10 वर्षात एकही सरकारी काम झालेलं नाही. पण खासदार खैरे यांनी या गावात 5 रस्त्यांची कामं केल्याचं केवळ कागदोपत्री दिसत आहे. मात्र, प्रत्यक्षात एकही काम झालेलं नाही. खासदार चंद्रकात खैरे हे औरंगाबादचे गेल्या 20 वर्षांपासून खासदार आहेत. त्यांना मतदार संघातील गावांची पाऊलवाट देखील पाठ आहे. तरी त्यांनी कन्नड तालुक्यातील सावरखेडा, खापेश्वर, झाडेगाव, तांडा या गावात खासदार निधी वितरीत केला, पण ही गावच कन्नड तालुक्यात नसल्याचा खुलासा खुद्द उप जिल्हाधिकाऱ्यांनी केला असून तसं पत्रही त्यांनी लिहिलं आहे. खासदार खैरे यांनी कन्नड तालुक्यात 2014-15 मध्ये 14.99 लाख रुपये निधी खर्च केला. 2015-16 साली जवळपास 2 कोटी, तर 2016-17 मध्ये 2 कोटी 40 लाखांचा निधी खर्च केला आहे. विशेष म्हणजे या सर्व निधीची कामं एकाच कंत्राटदाराने केली आहेत. खासदार निधी कसा खर्च होतो? - प्रत्येक वर्षी खासदाराला 5 कोटींचा निधी मिळतो - या निधीमध्ये मतदार संघातील कोणती कामं करायची त्याची निवड करण्याचे अधिकार खासदारांना असतात. - एखाद्या सोसायटीला काम देण्याची शिफारस खासदार करु शकतात. - याबाबतचं पत्र जिल्हाधिकाऱ्यांना जातं. पुढे जिल्हाधिकारी पॅनिंग ऑफिसला पत्र पाठवतात - हा निधी खर्च करण्याची जबादारी सार्वजनिक बांधकाम विभागाची असते. त्यासाठी बांधकाम विभागाकडून संबंधित कामाच्या देखरेखीसाठी एका अभियंत्याची नियुती केली जाते. अभियंत्याच्या अहवालानंतर पैसे कंत्राटदाराच्या खात्यात जमा होतात. खासदार निधी खर्च करण्याचे काही निकष आहेत. त्यामुळे अस्तित्वात नसलेल्या गावात कामं झाली कशी, बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांचा रिपोर्ट दिला कसा, कामच न करता त्याचे पैसे कसे उचलले, एकाच कंत्राटदाराला सर्व कामं का देण्यात आली हा सर्व गोष्टींची आता सखोल चौकशी होण्याची शक्यता आहे. संबंधित बातम्या: अस्तित्वात नसलेल्या गावासाठी निधी खर्च, शिवसेना खासदाराची करामत

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: महायुतीचे सरकार 2047 पर्यंत काम करणार: चंद्रशेखर बावनकुळे
Maharashtra Live blog updates: महायुतीचे सरकार 2047 पर्यंत काम करणार: चंद्रशेखर बावनकुळे
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
Nashik Heavy Rain : नाशकात पावसाचा हाहाकार! धारणांसह नदीपातळीत मोठी वाढ, हवामान विभागाकडून आज अतिवृष्टीचा इशारा, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
नाशकात पावसाचा हाहाकार! धारणांसह नदीपातळीत मोठी वाढ, हवामान विभागाकडून आज अतिवृष्टीचा इशारा, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
Amit Shah Pune Visit: अमित शाहांनी रात्री पुण्यात पाऊल ठेवताच पोलिसांची वेगवान कारवाई, 'त्या' भीतीमुळे युवक काँग्रेसच्या चार तरुण पदाधिकाऱ्यांना उचललं
अमित शाहांनी रात्री पुण्यात पाऊल ठेवताच पोलिसांची वेगवान कारवाई, 'त्या' भीतीमुळे युवक काँग्रेसच्या चार तरुण पदाधिकाऱ्यांना उचललं

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Samman Nidhi scheme: किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
Donald Trump: अमेरिकेचा इराणवर मोठ्या हल्ल्याचा 'मास्टरप्लॅन'? डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्याला दिले महत्त्वाचे आदेश, म्हणाले, 'एक वेळ अशी येईल की...'
अमेरिकेचा इराणवर मोठ्या हल्ल्याचा 'मास्टरप्लॅन'? डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्याला दिले महत्त्वाचे आदेश, म्हणाले, 'एक वेळ अशी येईल की...'
Nashik Heavy Rain : नाशकात पावसाचा हाहाकार! धारणांसह नदीपातळीत मोठी वाढ, हवामान विभागाकडून आज अतिवृष्टीचा इशारा, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
नाशकात पावसाचा हाहाकार! धारणांसह नदीपातळीत मोठी वाढ, हवामान विभागाकडून आज अतिवृष्टीचा इशारा, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
Arbaaz Sheikh Father Death Post: 'असं सोडून जायचं नव्हतं ..' वडिलांच्या निधनानंतर 'सैराट' फेम अभिनेत्याची पोस्ट; चाहतेही गलबलून गेले..
'असं सोडून जायचं नव्हतं ..' वडिलांच्या निधनानंतर 'सैराट' फेम अभिनेत्याची पोस्ट; चाहतेही गलबलून गेले..
इंग्लंडमध्ये धुरळा! कुलदीपच्या फिरकीत स्टोक्स गारेगार, तर आशुतोषचा विकेट्सचा पंच; गंभीर गुरुजी, आता तरी या दोन हिरोंकडे बघणार का?
इंग्लंडमध्ये धुरळा! कुलदीपच्या फिरकीत स्टोक्स गारेगार, तर आशुतोषचा विकेट्सचा पंच; गंभीर गुरुजी, आता तरी या दोन हिरोंकडे बघणार का?
Pakistan News: पाकिस्तानात मोठी दुर्घटना! कोळसा खाणीत भीषण स्फोट झाला अन् होत्याचं नव्हतं झालं; 32 कामगारांचा मृत्यू
पाकिस्तानात मोठी दुर्घटना! कोळसा खाणीत भीषण स्फोट झाला अन् होत्याचं नव्हतं झालं; 32 कामगारांचा मृत्यू

Embed widget