मुंबई :  केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेनेतील वाद शमण्याची चिन्हं दिसत नाहीयत. आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोक सदरातून राणेंवर पुन्हा हल्ला बोल केला. त्यानंतर नारायण राणे यांनी सिंधुदुर्गात एबीपी माझाशी बोलताना मोठे गौप्यस्फोट केले आहेत.  एबीपी माझाला दिलेल्या Exclusive मुलाखतीत नारायण राणे यांनी म्हटलं की,  मी ठाकरे कुटुंबियांना त्रास देणार नाही असा शब्द बाळासाहेब ठाकरेंना दिला होता. त्यांनी ज्या हेतूनं तो शब्द माझ्याकडून घेतला होता ते मी सांगू शकत नाही.  पण आज जे काही घडतंय त्यामुळे मला हे बोलावं लागतंय.  मला हे करायची इच्छा नाही शिवसेनेनं हे सगळे थांबवावे.  माझं उद्धव ठाकरेंशी वैयक्तिक काहीही वाईट नाही.  माझी प्रकरणं बाहेर काढायची आहेत तर काढा मग 'त्या' हत्या करायला कुणी सांगितल्या याची पण चौकशी करा असा खळबळजनक गौप्यस्फोट राणे यांनी केला आहे. 


आमच्या कुंडल्या काढायचं म्हणता, आम्ही संदुक उघडू तेव्हा पळता भूई थोडी होईल; संजय राऊतांचा राणेंवर पलटवार


राणे म्हणाले की, त्यांचेही हात पूर्ण दगडाखाली आहेत, उगाच मला बोलायला लावू नका.  मी वेळ येईल तेव्हा तेव्हा एक एक प्रकरण बाहेर काढेन.  उद्धव ठाकरे संजय राऊतांच्या माध्यमातून सगळे करतायत. माझ्यावर माझ्या कुटुंबियांवर जर कोण बोललं तर मी कसा सोडणार? असं राणे म्हणाले. 


'बाकीच्या सर्व यात्रा सुरळीत, राणेंनी मात्र येड्यांची जत्रा केली', संजय राऊतांची 'रोखठोक' टीका 


राणे म्हणाले की,  संजय राऊतांचा बोलवता धनी कोण आहे ते आधी तपासा.  मी स्वभावाने आक्रमक आहे. मी आधी कधी आदित्य व उद्धवजींवर कधी बोललो नाही. पण आज बोलावं लागतंय.  मी आज जे आहे ते कर्तृत्वाने आहे, असंही राणे म्हणाले. ते म्हणाले की,  बाळासाहेब असतानाच ठाकरी भाषा होती. ते गेले तशी भाषाही संपली .  आता जे बोलतात ती ठाकरी भाषा नाही. यापुढे ती भाषा चालणार नाही. 


...आधी आपल्या मुलांनी काय पराक्रम करुन ठेवलाय ते पहावं; नारायण राणेंचा शिवसेनेवर पलटवार


नारायण राणे म्हणाले की, दसरा मेळाव्यात कुठेही भाषणात किंवा खाजगीत जरी ते बोलतात तरी मला कळतं. त्यांचे रेकॉर्ड केलेलं भाषण माझ्याकडेही येतं.  खुनशी राजकारण कोण करतंय हे तुम्ही बघा. हे महाराष्ट्रासाठी योग्य नाही. ईडी सीबीआयच्या रडावर महाविकास आघाडीचे मंत्री आहेत, असंही राणे म्हणाले.